
चार जणावरांची सुटका, एकावर गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरात चालणार्या अवैध कत्तलखान्याबाबत गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्यापथकाने शहरातील जमजम कॉलनी येथील कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी एका वाहनात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आलेले चार जणावरांचा या पथकाने सुटका केली. 1 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार शहरातील जमजम कॉलनी येथे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची ने-आण करण्यात येत असल्याची गुप्त माहिती डिवायएसपी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस नाईक डोके, पोलीस कॉन्स्टेबल सारबंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. यावेळी जमजम कॉलनी येथे एक टाटा एसीई गाडी क्रमांक एमएच 14 सीडी 0839 हे वाहनाला आडवून वाहनाची तपासणी केली. यावेळी या वाहनात 4 गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने निर्दयी पणे बांधलेले आढळून आले. या जनावरांबाबत विचारपूस केली असता चालक सलमान रशिद शेख (रा. विजय नगर, माताडेमळा) याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलीसांचा संशय दाटल्याने या चालकाला ताब्यात घेण्यात आले. तसेच 40 हजार रूपये किंमतीची 4 गोवंश जनावरे व 1 लाख रूपये किंमतीची टाटा एसीई कंपनीची गाडी जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सलमान रशिद शेख याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 1995 चे कलम 5 (क) 9 (अ) व प्राण्यांना निर्दयीपणे वागवणे कायदा कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.