माहुली घाटात कार व मोटार सायकलचा अपघात

अपघातात एक ठार, दोन जखमी

दैनिक युवावार्ता (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परीसरातील एकल घाट परीसरात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी 1 वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की अकलापूर पवारमळा, बोरपाईन येथील कुटुंबातील तीघे जण दुचाकीवरून संगमनेरकडून अकलापूर येथे चालले होते ते मंगळवारी सकाळी साडेबारा वाजेच्या दरम्यान माहुली परीसरातील एकल घाटात आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक एम एच 12 आर एफ 5584 हीने दुचाकी क्रमांक एम एच 17 बी सी 2355 हिला पाठीमागून जोरदार धडक दिली यात रतनबाई ज्ञानेश्‍वर गवळी जागीच ठार झाल्या तर सुरेखा बर्डे व देवगन गायकवाड हे जखमी झाले .तर दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट महामार्गालगत असणार्‍या साइट गटारीत पडून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले
अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्रांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल संजय मंडलिक अरविंद गिरी, घारगांव पोलीस ठाण्याचे प्रमोद गाडेकर हायवे पेट्रोलिंगचे विजय खामकर आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर व खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख