पिण्याच्या पाण्याचा वापर स्टोन क्रशरसाठी

ग्रामस्थांची कारवाईची मागणी

कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचा आंदाेलनाचा इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील तळेगाव भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असताना काही ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेल्या ठिकाणाहून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा सुरू असल्याचे समोर आले. याबाबत तालुक्यातील निळवंडे, करुले आणि परिसरातील ग्रामस्थांनी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करून स्टोन क्रशरसाठी पाणी वापरले गेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
पाऊस न झाल्याने निळवंडे, करुले परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पोखरी शिवारात बेकायदेशीररीत्या बांध घालून नैसर्गिक स्रोत असलेल्या ठिकाणी मोटारी टाकून स्टोन क्रशरसाठी बेकायदेशीररीत्या पाणी उपसा चालू आहे.


शेतकरी तेथे गेले असता त्यांना दमदाटी, शिवीगाळ करून धमकविण्यात येते. काय करायचे ते करून घ्या, अशी भाषा बोलली जाते. स्टोन क्रशरसाठी बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणार्‍या संबंधितावर कारवाई व्हावी. शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. गत 50 ते 60 वर्षापासून नैसर्गिक स्रोत आहे. तेथे कोणताही बांध टाकण्याची अथवा पाणी उपसा करण्याची परवानगी नाही. तसेच जलजीवन मिशनची पाइपलाइन तेथे आढळून आली. बेकायदेशीररित्या वीजजोडणी घेऊन वीजचोरी सुरु आहे. त्या संदर्भात पंचनामा होऊन कारवाई व्हावी, अशीही मागणी ग्रामस्थानी केली आहे. पोखरी शिवारातील पाणी उपसा करण्यासाठी झालेले बांध आणि मोटारी कायमस्वरूपी काढून घेण्यात याव्यात. कार्यवाही न झाल्यास शेतकरी आंदोलन छेडतील असाही इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख