डॉ. प्रचिती कुलकर्णींच्या ‘मुक्ताईने’ श्रोते मंत्रमुग्ध

निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान आणि मुक्ताईंचा प्रवास रसिक संगमनेरकरांनी अनुभवला

संगमनेर (प्रतिनिधी)-ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून मागितले ते सार्‍या जगासाठी, ज्यांनी आयुष्यभर छळले, त्यांच्यासाठी मागितले, ज्ञानाचा भांडार असलेल्या माऊलीने वैष्णवांचा भक्ती मार्ग खुला केला आणि वैष्णवांचा शिरोमणी झालेले ज्ञानोबाराया आभाळाएवढे झाले. संजीवन समाधी घेतलेली माऊली सदैव आपल्यासमोर राहील या मुक्ताईच्या वचनाने श्रोत्यांनी साक्षात ज्ञानेश्वर माऊली अनुभवली.


कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ’मुक्ताई. एक मुक्ताविष्कार’ या विषयावर गुंफताना डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी यांनी श्रोत्यांना मुक्ताई रुपात देहू, आळंदी, आळे, नेवासा, सिद्धबेट, पंढरपूर असा ज्ञानेश्वर माऊलींचा प्रवास सादर केला. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संचीत भोजणे, ओंकारनाथ बिहाणी, जसपाल डंग, ज्योती मालपाणी, स्मीता गुणे, अनिल राठी उपस्थित होते.
निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान आणि मुक्ताई ही चार भावंड पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी गेली. तेथे ज्ञानोबा माऊलीने रेड्याच्या तोंडून वेद वदविल्याने तेथील पिठाधीशांसह सर्वच माऊलींच्या समोर नतमस्तक झाले. पुढे ही चारही भावंडं नेवासा येथे आली. तेथे अध्याय लिहितांना थोडेही श्रेय स्वतः कडे ठेवले नाही, मुक्ताईचा ज्ञानदा तेथेच आभाळाएवढा झाला. पसायदानातून ज्ञानोबा रायांनी स्वतःसाठी काही मागितले नाही, सर्व विश्व कल्याणासाठी मागितले. त्यावर गुरु मानलेल्या निवृत्तीनाथांच्या ’तथास्तु’ ने ज्ञानोबा आभाळाएवढे झाले. आळंदीला परतल्यावर या तिघा भावंडांना मुक्ताई आईप्रमाणे वाटली. गोदूबाईकडून आणलेले रांदळ विसोबा काकानी कसे फेकले, त्यानंतर ज्ञानोबांच्या पाठीवर भाजलेले मांडे.. त्यानंतर केलेली सेवा ज्ञानोबा रायांनी गुरु सेवा मानली. चांगदेव आले वाघावरून.. ज्ञानोबा निघाले भिंतीवरून माऊलींची महानता बघून गावकरी भिंतीसारखे स्तब्ध झाले. तर चांगदेवांनी ज्ञानदाचे पाय धरले. चांगदेवाला मुक्ताई आई स्वरुपात भेटली. गुरुकृपेने मुक्ती मार्ग सापडेल असे सांगत ज्ञानोबारायांनी लिहून पाठविलेल्या ओव्यांचा अर्थ मुक्ताईने चांगदेवाला समजावून सांगितला. संजीवन समाधी घेणा-या ज्ञानोबा माऊलीच्या निर्णयावरही मुक्ताई केवळ समाधान व्यक्त करत ज्ञानोबा माऊली सदैव आपल्यासमोर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख