प्राचीन परंपरेची चौकट मोडणारे – पुनरूत्थान

अप्रतिम अभिनय व उत्तम सादरीकरणाचा अनाेखा संगम

समाजात सातत्याने कोणता ना कोणता संघर्ष चाललेला असतो. धर्मसत्तेतील, राजसत्तेतील, गरीब-श्रीमंतीतील, स्त्री-पुरुष असा कोणताही झगडा हजारो वर्षांपासूनचा. प्रत्येक वादाला कोणता ना कोणता आयाम असतो. निसर्गपूजक मातृसंस्कृतीवर पुरुषसत्ताक आणि संहाराचे समर्थन करणारे नेहमीच हल्ला चढवतात. पुनरूत्थान नाटकाने हाच दिला. संदर्भ हजारो वर्षांपूर्वीचे असले, तरी ते एकविसाव्या शतकात तंतोतंत लागू पडतात. स्त्री-पुरुष, धर्म-सत्ता संघर्ष आजही तोच आहे. या सर्वांवर एकच रामबाण उपाय म्हणजे पुनरूत्थान.

राज्यनाट्य स्पर्धेत संगमनेरच्या रंगकर्मी प्रतिष्ठानने पुनरूत्थान नाटक सादर केले. वेगवेगळे संदर्भ घेऊन रंगमंचावर आलेल्या या नाटकाची घाटणीच वेगळी होती. पुण्याच्या प्रभाकर पवार यांनी दीर्घ मेहनतीने ही संहिता लिहिली. तेवढ्याच मेहनतीने दिग्दर्शक डॉ. अमित शिंदे यांनी तिचे सोने केले. आकलनासाठी जड वाटणारी ही संहिता सुजन आणि संहार, स्वी आणि पुरुष, धर्म आणि सत्ता यांच्यातील भेद दाखवून देते. तोच धागा शेवटपर्यंत रसिकाच्या मनात गुंता करीत राहतो.
या नाटकाची संहिता वेदांच्या काळाअगोदरची, हिंदुकुश पर्वताअलीकडे आणि त्याच्या पढिकडे असा भौगोलिक पट दाखवणारी. थोडक्यात सिंधू संस्कृती आणि त्याच्या अलीकडे-पलीकडचा कालखंड, मेहेरगड नावाचे राज्य आहे, तिथे सर्व सत्ता रिस्यांच्या ताब्यात आहे. त्यांचे निसर्गावर प्रेम आहे. त्यांची देवताही निसर्गातील. तीही स्त्रीच. शासक स्त्री असल्याने राज्यात सर्वत्र आनंदी आनंद, निसर्गाच्या सानिध्यात सुखासीन जीवन जगणारे.


राजाने आपली उत्तराधिकारी म्हणून आपल्या मुलीची अभिरबस याला शासक होण्याची इच्छा आहे. तो परकीय शक्तीसोबत हातमिळवणी करतो. तेथील धर्मगुरूंना आपल्याकडे पाचारण करतो. त्यांचा राजदरबारात प्रवेश घडवून आणतो. परंतु त्या धर्मगुरूंनीच स्वतः कावेबाजपणे त्या राज्यात प्रवेश केला आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. ते अभिरबसला बहिणीविरोधात भडकवतात, राजा असलेल्या पिल्यालाही मारायला भाग पाडतात, अभिरचस स्वतःला शासक म्हणजेच राजा असल्याचे घोषित करतो. परंतु धर्मपंडित येरेस आणि येरेवस या रक्तपिपासु देवतेची पूजा करण्यास कृषी संस्कृतीशी नाते सांगणार्‍या मेहेरगडला भाग पाडतात. हातातील नांगर टाकायला लावत त्यांच्या हाती शस्त्र देतात. येथेच त्यांच्यात अशांतता नांदते. यासाठी त्यांनी अगोदर धर्मावर आक्रमण केलेले असते. ते तेथील जनतेला सृजनाच्या देवताऐवजी आपल्या देवतांची पूजा करायला लावतात. धर्माचे राजकारण करतात.
राजा झालेल्या अभिरथसला राज्य विस्ताराच्या नावाखाली परमुलुखात नेतात, तेथे त्याचा छळ केला जातो, तेव्हा त्याला आपण मोठी चूक केल्याचे कळते. तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. परदेशी आक्रमक डायोनिसस व त्याचा मुलगा राजकुमार थिओस यांच्यातही संघर्ष आहे. थिओस राजा बनण्यासाठी उतावीळ आहे. तोच डायोनिससला संपवतो, त्यासाठी मेहेरगडवासी त्याला मदत करतात आणि आपल्या राज्याचे पुगंधरा पुनरूत्थान करते, असा भला मोठा आवाका असलेली ही कथा.
कथनाकार व बालवसुंधरा अपूर्वा कुलकर्णी, कथनाकार 2 शिवम नडगिरी, संदेशवाहक व रघुविरा मयूर बेल्हवरे, कथनाकार 1 शिल्पा शिरसाट, कचनाकार 2 सिद्धेश कुंभार, विश्तस्प डॉ. अमित शिदि, सेनापती बीरसेन हर्षल जोशी, अभिरथस गिरीश म्हस्के, राजा पौरुमीळ राजेंद्र जोशी, डक्टाईलस नीलेश खोमणे, शौरसेन – अभिजित दिवाकर, वसुंधरा विद्या मेस्त्री, कल्याणी दाई व डायोनिससची रखेल सारिका काची, अत्रेयस पटेसी दिनेश अगरवाडेकर, डायोनिसस योगेश पिसाळ, थिओस युसूफ शेख, युगंधरा प्रज्ञा जयश्री, प्रकाश योजना शेखर वाप, रंगभूषा सोहम सैंदाणे, संगीत संयोजन अंतून घोडके, नेपथ्य बाळकृष्ण पवार यांचे होते. एवढी कलाकारांची फौज घेऊन नाट्य उभे करणे दिव्य, दिग्दर्शक डॉ. शिंदे यांनी ते यशस्वी पेलले.
एक तर पठडीबाहेर जात केलेले नाट्य समाजातील बर्‍याच कंगोर्‍यांवर प्रकाश टाकते. 25 जणांच्या टीममध्ये लक्षात राहिला तो पटेसी दिनेश अगरवाडेकर, चेहर्‍यावर क्षणात बदलणारे भाव, डोळ्यातील क्रूरता आणि कावेबाजपणा नजरेत भरण्यासारखा, युगंधराच्या भूमिकेत प्रज्ञा उठून दिसली. तिच्या चेहन्यावरील निरागसतेने मातृसंस्कृतीचा प्रेमळपणा जाणवला, विश्तस्यची भूमिका स्वतः डॉ. शिद यांनी नेटाने केली. डायोनिसस आणि थिओस यांच्या भूमिकाही लक्षात राहण्यासारख्या, समर्पक नेपथ्य आणि तितकेच ताकदीचे संगीत या नाटकाला उंचावर घेऊन गेले. संघर्ष, संऐवजी लोकांना शांतता हवी आहे, ते सार्वकालीक सत्य आहे. सत्याचा आणि सूजनाचा संदेश देत या नाटकाने पुनरूत्थान केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख