दिंडीत ट्रक घुसला ; तीन वारकरी ठार-९ जखमी

घारगाव 19 मैल जवळ घडला भिषण अपघात – चालकास अटक

घारगाव (संजय आहिरे)


नाशिक- पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊ वारकरी जखमी झाले. ही दुर्दैवी घटना आज रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक क्रमांक MH 12 VT 1455 वरील चालक दारू पिलेला असल्याचे व त्याला डुलकी लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणने आहे.

या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटली नसून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी होती, सदर दिंडी ही आळंदी देवाची येथे प्रयान करत होती.

घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं प्रशासनाला केल्या असून तातडीने मदत पोहोचवली आहे.

साखर कारखाना, दूध संघ यांच्यासह पठार भागातील कार्यकर्त्यांनी तातडीने जखमींना मदत पोहोचून वारकऱ्यांना दिलासा दिला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत आमदार थोरात यांनी तातडीने सर्वांशी संपर्क साधून प्रशासनालाही याबाबत सतर्क राहून मदतीच्या सूचना केल्या आहेत.

यशोधन कार्यालय व संपर्क यंत्रणेने सर्व भाविकांच्या नातेवाईकांची संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली तसेच दिंडीतील सर्वांना मदत करत मोठा दिलासा दिला आहे…

अपघाताची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतील वारकऱ्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले असून या सर्व वारकऱ्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. या सर्व परिवारांच्या दुःखात आपण सामील असून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे

मृतांची नावे

  1. बाळासाहेब अर्जुन गवळी, रा. मढी, ता. कोपरगाव
  2. बबन पाटीलबा थोरे (चोपदार), द्वारकानगर, शिर्डी
  3. भाऊसाहेब नाथा जपे, कणकोरी, ता. राहाता
  4. ताराबाई गंगाधर गमे, कोऱ्हाळे, ता. राहाता

जखमींची नावे

  1. बीजलाबाई शिरोळे, वाळकी, राहाता
  2. राजेंद्र कारभारी सरोदे, मढी, कोपरगाव
  3. भाऊसाहेब दशरथ गायकवाड
  4. ओंकार नवनाथ चव्हाण, मढी खु., कोपरगाव
  5. निवृत्ती पुंजा डोंगरे, पंचाळा, सिन्नर
  6. शरद सचिन चापके, परभणी
  7. अंकुश ज्ञानेश्वर कराळ, अकोला
  8. मीराबाई मारुती ढमाले, वावी, सिन्नर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख