डॉ. एकता वाबळे – डेरे यांचा सुषमा स्वराज अवॉर्डने सन्मान

0
1834
डॉ. एकता वाबळे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – येथील संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. एकता जगदीश वाबळे-डेरे यांना भाजपा महिला मोर्चाच्यावतीने जागतीक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुषमा स्वराज अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


डॉ. सौ. एकता वाबळे -डेरे यांनी फिजीशिएन स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात मोठे काम केले आहे. संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोव्हीड काळात व त्यानंतरही रूग्णसेवेत समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा केली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी विविध आरोग्य शिबीरे तसेच व्याख्यान देऊन त्यांनी महिलांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचे काम केले आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर नगर विभागाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजीत विशेष कार्यक्रमात अकोले येथे झालेल्या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, सौ. रोहिणी नायडू, सोनालीताई नाईकवाडी या मान्यवरांच्या हस्ते डॉ. एकता वाबळे -डेरे यांचा सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे, स्मिता गुणे, दिलशाद सय्यद, प्रतिमा कुलकर्णी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल डॉ. एकता वाबळे -डेरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here