डॉ. अमेय देशमुख यांनी वाचिवले तरूणीचे प्राण

डॉ. अमेय देशमुख

श्वसननलिकेतील कानाची रिंग बाहेर काढून केले वेळेत उपचार

युवावार्ता (प्रतिनिधी) – संगमनेर – येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी असलेली तरूणी दाखल झाली. तिची तब्येत खालावत चालली होती आणि श्‍वास घेण्यास देखील त्रास होत होता. मेडिकव्हर हॉस्पिटलने तात्काळ श्‍वसनविकार आणि छातीरोग तज्ज्ञ डॉ. अमेय अनिल देशमुख यांना संपर्क केला. यानंतर त्वरीत डॉ. देशमुख हे मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.


रूग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर सी.टी. स्कॅन करण्याचे ठरले आणि तपासणीनंतर उजव्या फुफ्फुसामध्ये गोल वस्तू अडकली असल्याचे समजले. श्‍वसन नलिकेमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्याखालील भागात कफ अडकून न्यूमोनिया झाला होता. हा अडथळा दूर न केल्यास त्याखालील फुफ्फुस खराब होऊन तरूणीच्या जीवास धोका निर्माण झाला असता.अशा परिस्थितीमध्ये डॉ. अमेय अनिल देशमुख यांनी समयसूचकता दाखवत ब्राँकोस्कोपीच्या तपासणीद्वारे श्‍वसनमार्गातील अडथळा दूर करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन थिएटरमध्ये तरूणीस तात्पुरती भूल देऊन ब्राँकोस्कोपी तपासणी करण्यात आली. उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या श्‍वसन नलिकेमध्ये अडकलेली सोन्याची कानातील रिंग काढण्यात डॉ. अमेय देशमुख यांना यश आले. रूग्णाचा श्‍वसनमार्ग पुन्हा खुला झाल्याने न्युमोनिया कमी होण्यास मदत झाली व या तरूणीचा जीव वाचला. या तपासणीमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. घनकुटे व फिजिशियन डॉ. सुशांत गिते यांची मोलाची मदत मिळाली.


डॉ. अमेय अनिल देशमुख हे देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असून येथे पूर्णवेळ कार्यरत आहेत. श्‍वसनसंस्थेच्या आजारांवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा असून कोव्हिडच्या काळात अनेक रूग्णांची त्यांनी सेवा केली.दुर्बिणीद्वारे श्‍वसनसंस्थेमध्ये अडकलेले धान्य, शेंगदाणे्, नथ आदी वस्तू काढण्यामध्ये ते निष्णात आहेत. दमा, न्यूमोनिया, घोरण्याची समस्या, टी.बी., श्‍वसनसंस्थेचे सर्व विकार आदी उपचारांमध्ये ते निष्णात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख