गरिबीत जगतांनाही मेळघाटातील आदिवासी आत्महत्या व भ्रूणहत्यापासून दूर – डॉ. कोल्हे

0
1367

कवी अनंत फंदी व्याख्यानमालेची आत्तापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद – आमदार बाळासाहेब थोरात

5 रूपयात लग्न आणि 400 रूपयात संसार
सामान्यपणे लग्न करतांना मुलामुलींच्या अनेक आशा-अपेक्षा असतात. मात्र पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे यांनी लग्न करतांना मुली समोर 5 रूपयात लग्न करावे लागेल. 400 रूपयात महिनाभराचा संसार चालवावा लागेल. 40 किलो मीटर पायी चालण्याची तयारी असावी. तसेच समाजासाठी गरज पडली तर भीक मागण्याचीही तयारी ठेवावी अशी अजब अट ठेवली होती. ही अट डॉ. स्मिता कोल्हे यांनी मान्य केली आणि या उभयंतांचे लग्न झाले. कोल्हे, मांजरे, वाघ, लांडगे, बोके, डुकरे या नावांचेच माणसे डॉ. स्मिता कोल्हे यांच्या आजूबाजूला वावरल्या किस्सा सांगतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महाराष्ट्रातील अती दुर्गम म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेळघाटात प्रचंड गरीबी आहे. अशिक्षितपणा प्रचंड आहे. अनेक वेळा सरकार व प्रशासनाचे दुर्लक्ष होते. हे सर्व असताना तिथे महिलांना सन्मान आहे, अधिकार आहेत. आत्महत्या नाही की भ्रूणहत्या नाहीत. अनेक समस्या असताना देखील येथील महिला खुपच आनंदी व समाधानी आहेत. हा आनंद सर्व सुखसोयी असणार्‍या शहरात नाही अशी खंत व्यक्त करत आदिवासींसाठी काहितरी काम करता आले याचे खुप समाधान असल्याचे उदगार पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी काढले.
येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प मेळघाटच्या वाटेवरून चालताना’ या विषयावर डॉ. स्मिता कोल्हे व डॉ.रवींद्र यांनी संवाद साधला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. यावेळी आमदार सत्यजीत तांबे, ओंकारनाथ बिहाणी, जसपाल डंग, अ‍ॅड. ज्योती मालपाणी, स्मीता गुणे, अ‍ॅड. प्रदीप मालपाणी उपस्थित होते.


डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या, मेळघाटात शोषण करणारा आणि शोषण घेणारा हे दोन वर्ग प्रामुख्याने जाणवले. त्यावरही काम सुरु केले. तेथील महिलांना संघटीत केले. त्यांच्या आरोग्यविषयी जागृती केली. आर्थिक सक्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी अनेक प्रयोग केले. आज वीज, पाणी, शौचालय, रस्ते, वैद्यकीय सेवा सर्व सुविधा तेथे उपलब्ध होत आहेत. आदिवासी महिलांवरील अत्याचार थांबले. स्त्री जन्माचे स्वागत होऊ लागले, असेही डॉ. स्मिता कोल्हे यांनी सांगितले.
डॉ. रविंद्र कोल्हे म्हणाले, आदिवासी विभागात आरोग्य सेवेपासून सुरुवात करतांना आलेल्या अनुभवांनी जीवन जगण्याची हिम्मत अधिकच वाढत गेली. या भागातील जनतेसाठी काय करता येईल ? असा सारखा प्रश्न सतावत असतांना संघर्षाची लढाई सुरू झाली ती तेथील जीवनमान समजून घेण्याची, तेथील माणसांना समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा तेथील लोकांना आमच्यावर विश्वास बसला तेव्हा त्यांनी आम्हाला स्विकारले. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर सुरु केलेलं काम महिलेविना अधुरं आहे – हे आरोग्य सेवा देतांना लक्षात आलं, तेव्हा स्मिताची साथ मिळाली आणि पुढे एक एक संकटे पार करत गेलो. अंधश्रद्धा, भगत यांचा आधार घेणार्‍या लोकांनी आम्हाला स्विकारलं. दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण यावर भरीव काम झाल्याने तेथील परिस्थिती सुधारली आहे, याचा आनंद असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून आमदार बाळासाहेब थोरात यांनी कवी अनंत फंदी व्याख्यान मालेची आत्तापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगत दरवर्षी आपण या व्याख्यानमालेला असतो तो हक्क आपण कायम ठेवला आहे. नव्या पिढीलाही या व्याख्यानमालेतून प्रेरणा मिळेल.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, कवी अनंत फंदी व्याख्यान माला ही संगमनेरकरांसाठी विचारांची देणगी आहे. हे कवी अनंत फंदी सभागृह आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंधिस्त सभागृह होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here