सावकारांच्या घराची उपनिबंधक कार्यालयाकडून झाडाझडती

आम्हाला न्याय द्यावा – संगीता वाकचौरे
राहुल व सचिन डोंगरेच्या वडिलांनी घर नावावर करण्यासाठी मुलांना मारहाण केली. सून व माझ्या अंगावरील सर्व दागिने विकले. चार पटीने पैसे दिले. तरीही अद्याप कर्ज बाकी आहे. किराणा दुकानात माल नसल्याने तेही बंद आहे. घरात खायला अन्न नाही. स्वतःच्या घरात भाडे तत्वावर राहण्यासाठी दबाव टाकण्यात आला. 10 हजार रुपये महिन्याला भाडे दिले नाही तर हाकलून देऊ, अशी धमकी किसन डोंगरे व बन्सी डोंगरे यांनी दिली. कर्जापायी भिकारी झालो. आम्ही किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सावकारावर कारवाई झाल्याचे समजले. आता आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा, अशी विनवणी संगीता वाकचौरे यांनी बोलताना केली.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- तालुक्यातील साकूर येथील संगिता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्यांनी सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी बुधवारी (14 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली होती. या घटनेचे गांभीर्याने दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना अनधिकृत सावकारी करणार्‍या सावकारावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्या सावकारांच्या घरावर संगमनेर उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने छापा मारून चेक पुस्तके, खरेदी खत व महत्वाचे कागदपत्र जप्त केल्याचे समजते.
दरम्यान वाकचौरे दाम्पत्यांनी निवेदनात जिल्ह्याधिकारी यांनी म्हटले कि, साकुर येथील सावकार राहूल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे यांच्याकडून व्यवसायासाठी व्याजाने कर्ज घेतले होते. त्यांनी ठरलेल्या रकमेच्या व्याजापेक्षा चारपट पैसे वसूल केले. तरीही आणखी पैशाची मागणी करत आहे. तसेच ते आमचे घर बळकाविण्यासाठी वेठीस धरत आहे. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत गावात बदनामी करत आहे. पोलिसात खोटे गुन्हे दाखल करणार असल्याचा दबाव टाकतात. पोलिसही मदत करत नसल्याचा आरोप वाकचौरे दाम्पत्याने केला आहे. सावकारांकडून वारंवार होणार्‍या जाचाला आम्ही कंटाळलो आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नाही. म्हणून माझ्या कुटुंबला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या. अन्यथा आम्ही जीवन संपवून टाकू, असा इशारा चाकचौरे यांनी निवेदनातून दिला होता. दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना कारवाईचे आदेश दिले. वाकचौरे दाम्पत्यांनी अनेकदा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र, अधिकार्‍यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिली नव्हती. वाकचौरे दाम्पत्यांच्या तक्रार अर्जावरून राहूल व सचिन डोंगरे यांच्या घरावर छापे टाकून कारवाई करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे, अल्ताफ शेख, ज्ञानेश्वर गोरे, सहायक सहकार अधिकारी प्रदीप वीरनारायण, बी. एन. चतुरे या पथकाने डोंगरे यांचे घर व दुकानावर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. कारवाईत महत्वाचे दस्त जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अनधिकृत सावकारी करणार्‍या डोंगरे बंधूंवर प्रशासन काय कारवाई करतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
गरजूंना उद्योग, व्यावसायाबरोबरच अडचणीच्या काळात कर्जाची गरज असते. मात्र बँका, पतसंस्था कर्ज देतांना अनेक नियम व अटी घालतात. कर्ज फेडण्याची नियत पहाण्यापेक्षा नियम पाहिले जात असल्याने गरजूंना सावकारचे उंबरठे झिजवावे लागतात व त्यातून अनेकांची लुटमार व फसवणूक होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख