फायनन्स कर्मचार्‍याला कर्जदाराची मारहाण

0
1570


आरोपीवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याचे वेळेत हप्ते भरले नाही. अनेक हप्ते थकल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी बजाज कंपनीचा कर्मचारी कर्जदाराच्या घरी गेला असता सदर कर्जदाराने या कर्मचार्‍यास दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या सहकार्‍यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना आज गुरूवारी सकाळी 9.30 च्या सुमारास तालुक्यातील निमज येथे घडली.


याबाबत तालुका पोलीसांची माहिती अशी की, विक्रम सहादू डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर) यांने बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र ते कर्ज त्याने थकवले होते. कंपनीच्या धोरणानूसार व जबाबदारी म्हणून श्रीराज उमेश गाडेकर हे वसूली कर्मचारी अरोपी विक्रम डोंगरेच्या घरी वसूलीसाठी गेले होते. मात्र डोंगरे यांनी हप्ता भरण्यास नकार दिला. तसेच कर्ज भरणार नाही काय करायचे करून घ्या असे म्हणत धक्काबुक्की केली. तम्ही कर्ज भरून टाका अन्यथा जप्ती सारखी कारवाई करावी लागेल असे सांगत असतांना आरोपी विक्रम डोंगरे याने फिर्यादी श्रीराज गाडेकर याच्या तोंडावर दगड फेकून मारला. यात त्यांच्या गालाला दुखापत झाली. तसेच फिर्यादीचे सहकारी विनायक पाठसकर व यश मोरे यांनाही आरोपीने शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी तालुका पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here