महसूल धोरणाविरोधात बांधकाम कामगारांचा आक्रोश

कामगारांचा आक्रोश

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्य सरकारने गौण खनिजावर बंदी आणल्यामुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल विभाग व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निषेधार्थ संगमनेर येथे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या कामगारांनी प्रांताधिकारी कार्यालय हजारोच्या संख्येने मोर्चा काढून आपला संताप व निषेध नोंदवला.

संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथून सकाळी साडेदहा वाजता या महाआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यशोधन कार्यालय, नाशिक रोड, बस स्थानक मार्गे हा मोर्चा संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन प्रांत अधिकारी कार्यालयाचा परिसर तणाव सोडला होता. बांधकाम क्षेत्र हे पायभुत विकासाचे मुख्य क्षेत्र आहे. दरम्यान महसूल विभागाने व महसूल मंत्र्यांनी जिल्ह्यात व विशेषत: संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांपासून बांधकाम व्यावसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या मजूरांसह व्यावसायीकांचे प्रचंड नुकसान होत आहे. बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, अभियंते व विविध व्यावसायीक यांनी मोठे कर्ज उचलून या व्यावसायात गुंतवले आहे.

तसेच अनेक मजूरांचे संसार, मुलाबाळांचे शिक्षण या व्यावसायावर अवलंबून आहे. परंतू शासनाच्या धोरणामुळे आज घडीला हा व्यावसाय अडचणीत आला आहे. तयामुळे गरीबांची उपासमार तर उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर अर्थिक नुकसान होत आहे. महसूल विभागाने या धोरणाच बदल करून बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी, मुरूम, दगड, माती, कच उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी या मोर्चात बांधकाम अभियंते, ठेकेदार, सेंट्रीग ठेकेदार, फरशी कामगार, खोदकाम करणारे, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, सुतार, रंग काम करणारे, कुशल, अकुशल कामगार, वाहन चालक सह कुटूंब या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, इंजिनिअर गोरक्ष कर्पे, योगेश पवार, सुभाष सांगळे, वैष्णव मुर्तडक, नवनाथ अरगडे, यांच्यासह अनेक राजकीय व बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार, व्यावसायीक उपस्थित होते. यावेळी मोर्चेकरांच्या वतीने महसूल प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजारोंच्या संख्येने बांधकाम कामगार, ठेकेदार, स्टोन क्रेशर चालक असे अनेक बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.

मोर्चात गाढवांची एंट्री
आजच्या या भव्य जन आक्रोश मोर्चात मी प्लंबर, मी सुतार, मी गवंडी, मी मजूर, मी बिगारी, मी वडार, मी रंगारी अशा प्रकारचे अनेक व्यावसायीकांनी फलक करून नागरीकांसह प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याच बरोबर या मोर्चात ज्या गाढवांद्वारे नदी पात्रातून अवैध वाळू उपसा केला जातो त्यांचाही समावेश करण्यात आल्याने शहरात चर्चेचा विशेष झाला आहे. दरम्यान असंघटीत कामगारांनी आज संगमनेरात भव्य दिव्य असा मोर्चा काढून महसूल प्रशासनाचा एकमुखी निषेध केला. यावेळी भाषण करणार्‍या अनेक मान्यवरांनी महसूल मंत्र्यांच्या सुडबुद्धीवर व कार्यपद्धतीव टिका केली. या मोर्चाने संपूर्ण नविन नगर रोड परिसर व्यापून टाकला होता. यावेळी पोलीसांनी खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख