आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून देवकौठेतील 27 असंघटित कामगारांना साहित्य संचाचे वितरण

0
1647

मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा साहित्यिक सह होणार अनेक लाभ

संगमनेर (प्रतिनिधी) काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने संगमनेर तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य करतात विविध विकासाच्या योजना राबवल्या जात असून यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून देव कवठे येथील 27 असंघटित कामगारांना साहित्य संचाचे वितरण करण्यात आले.

देवकौठे येथे साहित्य वितरण प्रसंगी नाशिकचे नगरसेवक भागवतराव आरोटे, यशोधन कार्यालयाचे नामदेव कहांडळ, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, देवकवठे सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे, माजी चेअरमन राजेंद्र कहांडळ जनसेवक राजेंद्र दिघे, बाबासाहेब गाजरे,अजित मुंगसे, दादा मुंगसे, शिवनाथ पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावातील वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवताना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला जात आहे. या अंतर्गत असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने देव कवठे मधून 60 कामगारांची नोंदणी झाली असून 27 जणांना साहित्य संस्थेचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना भागवतराव आरोटे म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गोरगरिबांच्या विकासासाठी काम केले आहे. राज्यातील सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख असणारे आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरले असल्याचे ते म्हणाले.

तर जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे म्हणाले की ,यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या जात असून यामधून आरोग्य विमा मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा साहित्यिक सह अनेक लाभ या लाभार्थींना होणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र कहांडळ यांनी केले तर नामदेव कहांडळ यांनी आभार मानले यावेळी गावातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here