उघड्या गटारीत जनावरांचे मृतदेह

0
1910
उघड्या गटारीत जणावरांचे मृतदेह

नागरीकांचे आरोग्य धोक्यात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरालगत असणार्‍या गुंजाळवाडी हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरातील उघड्या सार्वजनिक गटारीत कचर्‍यासोबतच जनावरांचे मृतदेह पडलेले असतात. हे मृतदेह सोडल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. तसेच डासांच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या उघड्या गटारीची स्वच्छता वेळच्या वेळी करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.


गुंजाळवाडी येथून सांडपाणी वाहून नेणारी उघडी गटार लक्ष्मी नगर येथून वाहते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत आहे. या परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने कचराकुंडीची पुरेशी सोय नसल्याने अनेक नागरिक या गटारीत केर कचरा टाकतात. यात उष्ट्या आन्नाचाही समावेश असल्याने मोकाट जनावरे ते खाण्यासाठी या गटारीत जातात. परंतु अनेक वेळा विषबाधेमुळे व इतर कारणांमुळे ते मृत होऊन तेथेच पडतात. मात्र हे मृतदेह सडल्यानंतर त्याचा उग्र वास येऊन मोठी दुर्गंधी सुटत असल्याने या परिसरातील नागरिक हैराण झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here