मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कोठडी

अत्याचारास मदत करणारा कॅफे चालक गजाआड

अशा गंभीर गुन्ह्यात मदत करणाऱ्या चालक अथवा मालकांवरही कठाेर कारवाई करण्याचा पाेलीसांचा ईशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ओळखीचा गैरफायदा घेत एका युवकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला दर्शनाला जाऊ, असे सांगून फसवून संगमनेर येथील एका कॅफेत नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. तक्रारी नंतर अत्याचार करणार्‍या युवकास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान ज्या कॅफेमध्ये हा अत्याचार करण्यात आला त्या कॅफे मालकावर गुन्हा नोंदवत रविवारी उशिरा त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पठारभागातील एका शाळेमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीची पठार भागातील गणेश सुखदेव भडांगे या युवकासोबत ओळख झाली होती. गणेश हा आपल्या दुचाकीवरून पीडित मुलीच्या गावाजवळून जात असताना या मुलीने शाळेपर्यंत सोड असे त्याला सांगितले. शाळेपर्यंतच्या प्रवासात ओळख झाल्याने त्याने तिला आपला मोबाईल क्रमांक देऊन काही अडचण असल्यास सांगत जा असे तिला सांगितले. त्यानंतर त्याने शनिवारी सकाळी 9 वाजता या विद्यार्थिनीला तिच्या शाळेत सोडले. त्यानंतर त्याने सकाळी साडेदहा वाजता पुन्हा शाळेच्या आवारात येवून तिला बोलावून घेतले व आपण देव दर्शनाला जावू असे सांगून तिला आपल्या गाडीवर बसवले. यानंतर त्याने दर्शनाला न जाता संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील ऐंजल कॅफे या ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केला. या कामी सदर कॅफे चालकाने या गुन्ह्यात आरोपीला मदत केली.


यावेळी सदर विद्यार्थिनीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिला मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर त्याने या विद्यार्थिनीला पुन्हा दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाळेत नेऊन सोडले. पिडीत विद्यार्थिनीने घरी गेल्यावर घडलेली हकीकत सांगितली. तिच्या पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश सुखदेव भडांगे (वय 21, रा. शेंंडेवाडी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापुढे कोणतेही कॅफे, हॉटेल, लॉज, चालक-मालक अशा गंभीर गुन्ह्यात मदत करतांना अढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा इशारा पोलीसांनी दिला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख