पैसे डबल करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची फसवणूक

0
1906

पाच जणांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनरे – पैसे दुप्पट करण्याचे आमीष दाखवून येथील एका व्यापार्‍याला मोखाडाच्या जंगलात नेवून पुजा अर्चेचा बहाणा करून तब्बल 5 लाख रुपयांना लुटल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी असलेले व युवा कार्यकर्ते यांचा शिवशक्ती इंटरप्रायजेस आईल डिस्टयुबिटर या नावाने व्यवसाय आहे. त्यांनी महेंद्र गोडसे याचा गाळा भाड्याने घेतला आहे. दोघांची ओळख झाल्यापासून महेंद्र हा नेहमी फिर्यादीच्या ऑफिसमध्ये येत होता. महेंद्र हा मे महिन्यामध्ये एका दिवशी या व्यापार्‍याच्या कार्यालयात बसला असता, त्याने कळस येथील आपला मित्र अशोक अगविले हा पैसे डबल करून देतो असे सांगितले होते.


त्यानंतर अशोक अगिवले यास आपल्या ऑफिसवर घेवून ये नंतर बघु असे फिर्यादीने त्यास सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसानी महेंद्र हा अशोक अगिवले (रा. कळस) याला दुकानात घेऊन आला. आतापर्यंत आपण भरपुर लोकांना यापुर्वी पैसे डब्बल करून दिलेले असून आपण स्वतः ही पैसे डब्बल करून घेतलेले आहे. त्या पैशामध्ये मी गावाला दहा एकर जमीन विकत घेतली असून त्यामध्ये मी पाण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांची पाईपलाईन केली असल्याचे त्यांनी सांगितले.


यावर विश्‍वास ठेवत आपण पैसे लावतो पण हमी म्हणुन तुम्हा दोघांचे कोरे चेक द्या, असे फिर्यादीने त्यांना सांगितले. त्यावर आता आमच्याकडे चेक बुक नाही असे सांगून पैशांची हमी मी घेतो असे महेंद्र म्हणाला. पैशाचा मोह न आवरल्याने फिर्यादी पैसे देण्यास तयार झाले व 6 जुलै रोजी मोखाडा येथे गेले. अशोक अगिवले, गुरुनाथ कातकरी, सोमनाथ पालवी यांनी एका वाहनांमधून प्रवास करून एका जंगलामध्ये चालक प्रकाश दिघे याने गाडी थांबविली. अशोक अगिवले, गुरुनाथ कातकरी, सोमनाथ पालवी हे एका मोठ्या झाडाखाली थांबले. त्यावेळी महेंद्र गोडसे यांनी पाचशे रुपयांची एक नोट मागीतली. तेव्हा फिर्यादीने एक नोट दिली. या ठिकाणी नोटा दुप्पट केल्या असल्याचे दाखविण्यात आले. नोटा दुप्पट झाल्याचे सांगून एक लाख रुपये द्या त्याचे पाच लाख रुपये करतो असे सांगितले. त्यानंतर सर्वजण संगमनेरला आले.


दरम्यान (दि.7) जुलै रोजी महेंद्र गोडसे याने दुकानावर येऊन 5 लाख रुपये तयार ठेवा. त्याचे जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखविले. (दि.8) जुलै रोजी सर्वजण मोखाडा येथे गेले. कापडी पिशवीमध्ये ठेवलेली 5 लाख रुपयांची रोख रक्कम सोमनाथ त्याच्याकडे देण्यात आली.
मात्र रक्कम दुप्पट झाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी महेंद्र गोडसे, अशोक आगिवले, गिता महेंद्र गोडसे, सोमनाथ पालवी, गुरुनाथ कातकरी यांच्या विरोधात पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

kajale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here