थोरात कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ

0
1552

विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर राहणार उपस्थित

शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन

संगमनेर ( प्रतिनिधी ) सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते व मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे  यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 10 लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त  गाळप केले आहे. शेतकरी,सभासद, कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास असून या कारखान्याने यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सर्वाधिक 2835 रुपये  भाव दिला आहे.

हे वर्ष अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून  साजरे होत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजनही केले आहे.

चालू वर्ष 2023 – 24 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभाची शुक्रवारी कारखान्याचे संचालक मिनानाथ गोपीनाथ वर्पे व त्यांच्या सुविध पत्नी सौ. हिराताई मिनानाथ वर्पे, डॉ तुषार दिनकर दिघे व त्यांच्या सुविध पत्नी सौ सुरेखाताई तुषार दिघे, माणिकराव दाजीबा यादव व त्यांच्या सुविध पत्नी सौ .लताताई माणिकराव यादव, संभाजी दगडू वाकचौरे व त्यांच्या पत्नी सौ. सिंधुताई संभाजीराव वाकचौरे, संचालिका सौ. मंदाताई शेखर वाघ व  शेखर तुकाराम वाघ  यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन पूजा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here