डॉ. संजयजी मालपाणी (भाऊ) वाढदिवस अभिष्टचिंतन !
संगमनेरचे भूषण असलेले ‘डॉ. संजयजी मालपाणी’ यांचा आज वाढदिवस. (Dr. Sanjayji Malpani Birthday) मास्टर इन कॉमर्स, मार्केटिंग व फायनान्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बालविकास या विषयात डॉक्टरेट असणारे संजूभाऊ उच्च विद्याविभूषित आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातही अहोरात्र कष्ट करून संशोधन, वाचन, लेखन ते आजही अगदी जोमाने करतात. गीतेचे 18 अध्याय, त्यातील 700 श्लोक कंठस्थ करताना विद्यार्थी बनून त्यांनी ते पाठ केले. वक्ता दशसहेस्त्रु कसा असावा हे बघायचे असेल तर मालपाणी लॉन्स येथील त्यांच्या ‘सहज सोपा-यशाचा मार्ग’ या ओजस्वी व्याख्यानमालेसाठी हजारोंची झालेली गर्दी सर्वांनी अनुभवली. बाल संस्कार, पालकत्व, योग, उद्योग, बालकामगार विरोध, शैक्षणिक आदी विषयांत त्यांनी 3500 पेक्षाही जास्त व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. विद्यार्थ्यांचा कल बघून शैक्षणिक वाट दाखविणारा शिक्षणतज्ज्ञ म्हणून संजूभाऊंची ख्याती आहे. शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम बघताना शिक्षक आणि विद्यार्थी कसे जपले पाहिजेत हे कॅप्टन म्हणून त्यांनी दाखवून दिले.
आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघ नवी दिल्लीचे उपाध्यक्ष असलेले डाॅ. संजयजी मालपाणी यांनी योगासनमध्ये संपूर्ण भारतात एक वेगळी क्रांती केली आहे. प.पू. रामदेव स्वामी यांच्या मदतीने 75 कोटी सूर्यनमस्कार घडवून आणण्यात भाऊंचा मोठा वाटा आहे. या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये निवड झाली. प.पू. स्वामी गोविंदगिरीजी यांच्या हस्ते स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या २५ राज्यांमध्ये शाखा आहेत. संगमनेर पोस्ट ऑफिसने भाऊंचा विशेष सन्मान करत त्यांचे तिकीट प्रकाशित केले आहे.
भाऊंना ऐकण्याची संधी मला अनेक वेळेस मिळाली. खूप कमी व्यक्तींना हे माहित असेल की जेवढे पोक्तपणे आणि विषयाला अनुसरून भाऊ बोलतात त्यापेक्षा वेगळेही हसवून ते व्याख्यान देऊ शकतात. एका व्याख्यानामध्ये दोन तास भाऊंनी सर्वांना खळखळून हसवले. त्यांची विनोदी भाषणशैली जर कोणी ऐकली तर ते भारतातले नावाजलेले स्टँडअप काॅमेडिअन आहेत असा अनुभव येतो. एकदा भल्या पहाटे आमची दोघांची गाडी समोरासमोर आली. त्यांनी गाडीतून माझा फोटो काढला आणि म्हटले हा फोटो पेपरमध्ये देऊ का? त्यांच्याशी बोलणे, त्यांना ऐकणे हा एक सुखद अनुभव असतो.
गीता परिवार, पालकत्व या विषयावर 400 पेक्षा जास्त लेक्चर्स, योगा आणि नेचरोपॅथी, विंड व सोलर पॉवर, संगमनेर फेस्टिव्हल, सामुदायिक विवाह सोहळा या कामांतून त्यांनी संगमनेरकरांपुढे आदर्श घालून दिला आहे. विधानसभेमध्ये शैक्षणिक दर्जा आणि धोरण यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. संस्कार ज्योती, मैं भी बनू महान, दोन शब्द आईसाठी..दोन शब्द बाबांसाठी ही त्यांची गाजलेली पुस्तके.
मालपाणी उद्योग समूहाचा कारभार बघताना शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. ध्रुव ग्लोबल स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ पाठयपुस्तकातून न घडविता त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा विचार त्यांनी केला.
उच्च प्रतीचे, सुसंस्कारित आणि यशस्वी जीवन सहजतेने कसे जगावे ही कला संजूभाऊंकडून शिकण्यासारखी आहे. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने मा. डॉ. संजयजी मालपाणी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
ईश्वर: त्वां च सदा रक्षदु
पुण्यकर्मणा कीर्तिमार्जय
जीवनम् तव भवतु सार्थकं
इति सर्वदा मुदम् प्रार्थयामहे।।
-सुदीप हासे
कार्यकारी संपादक, दैनिक युवावार्ता, (7720046005)