भाऊजी आदेश बांदेकरांसोबत महिलांमध्ये रंगणार ‘होम मिनीस्टर’

0
1625

सहभागी महिलांना मिळणार पैठणीसह विविध बक्षिसे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 7 वाजता होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला कार्यक्रम जाणता राजा मैदानावर होणार आहे. यावेळी संगमनेर मधील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.जयश्रीताई थोरात व माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव समितीच्या वतीने जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली असून काल पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडला.
आ. बाळासाहेब थोरात व माजी आ. डॉ. तांबे यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समितीने अत्यंत उत्कृष्ट केलेले नियोजन, आलेल्या सर्व पाहुण्यांचे आदरतिथं , जर्मन हंगर पद्धतीचा भव्य शानदार मंडप, सुसज्ज बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, एलईडी वॉल ,पार्किंग व्यवस्था, आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हा कार्यक्रम संस्करणीय ठरला
या कार्यक्रमासाठी राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीसह तालुक्यातील गावागावा मधून नागरिक युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मंगळवारी जाणता राजा मैदानावर खास महिलांकरता होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांचा खेळ मांडला. हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अनेक महिला सहभागी होणार असून या सर्वांना पैठणीसह विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक आमदार सत्यजित तांबे डॉ. जयश्रीताई थोरात जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here