संजय गांधी नगरमधील नागरीकांना मिळणार आता हक्काची जागा

गेली अनेक वर्षे येथील नागरीक हक्काच्या जागेसाठी संघर्ष करत आहे. यासाठी अनेकवेळा आंदोलने केली, मोर्चे काढले. तत्कालीन पदाधिकारी, अधिकारी यांनी सहकार्य केले. त्यामुळे आज त्याचे फलित मिळत आहे. मात्र ऐवढी वर्षे झोपेचे सोंग घेतलेल्या स्थानिक भाजिक पुढार्‍यांनी आता श्रेयवादाचे नाटक करू नये अशी विनंती वजा इशारा अमर कतारी यांनी दिला आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून हक्काचा असेसमेंट उतारा देण्याच्या प्रलंबित मागणीला आज अखेर यश आले असून संगमनेर नगर परिषद प्रशासनाचे तसेच माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे सर्व माजी नगरसेवक आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आजवर केलेल्या सहकार्यामुळेच या लढ्याला यश आले असल्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर भाऊ कतारीयांनी सांगितले संजय गांधी नगर वडार वस्ती व परिसरातील झोपडपट्टी धारकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण झाले असून प्रशासनाचे आभार मानत अमर भाऊ कतारीयांच्या सातत्यपूर्वक लढायचे हे फलित मानले जात आहे त्याबद्दल परिसरातील रहिवाशांनी अमर भाऊ कतारी यांचे जाहीर आभार व्यक्त केले यावेळी बोलताना कतारी यांनी सांगितले की या प्रलंबित मागणीला यश आले असून प्रशासनासोबतच माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यासोबतच विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले परंतु संगमनेर येथील स्थानिक भाजप नेत्यांनी श्रेयवादाच्या स्पर्धेत जाऊन उगाचच श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू नये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रलंबित मागणी संदर्भात शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली होती त्याचवेळी घरपट्टी व असेसमेंट उतारा रहिवाशांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते त्यासोबतच म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत सर्व आराखड्यांना देखील मंजुरी मिळाली या आढावा बैठकीला संजय गांधी नगर येथील रहिवासी देखील उपस्थित होते त्यामुळे गेले 40 वर्ष झोपेचे सोंग घेतलेल्या उदासीन भाजप नेत्यांनी श्रेय लाटायचा खोटा प्रयत्न करत मध्ये लुडबुड करूच नये असा इशारा देखील अमरकतरी यांनी दिला एवढी वर्षे पुनर्वसनाबाबतच्या कुठल्याच आंदोलनात सहभागी न होऊन आज अचानक काही श्रेय लाटणाऱ्या भाजप नेत्यांना साक्षात्कार कसा झाला हा देखील प्रश्न समोर येत आहे पुरावे म्हणून वृत्तपत्र प्रतिनिधींना अमर कतरी यांनी संगमनेर नगर परिषद नागरी औद्योगिक वसाहत अधिनियमाचा नुसार दिनांक९जानेवारी रोजीची मालमत्ता क्रमांक असलेली शासनाची अधिकृत करपट्टी देखील बिल नंबर सहसादर केले आहे त्यामुळे हा लढा सर्वस्वी स्थानिक रहिवाशांच्या एकजुटीमुळे व संगमनेरात विकासाच्या दृष्टीने राजकारण करणाऱ्या नेत्यांमुळेच शक्य झाला आहे त्यामुळे निवडणूक तोंडासमोर दिसतात आपण न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची जुनी खोड स्थानिक भाजप नेत्यांनी थांबवावी ही विनंती देखील त्यांनी केली. त्यासोबतच आमदार सत्यजित तांबे यांचे देखील विशेष आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख