कळस कृषी प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

शेतकरी सन्मानासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – उत्तर महाराष्ट्रातील मोठे कृषी प्रदर्शन ठरलेल्या व लाखो शेतकर्‍यांनी भेट देऊन गौरविलेल्या अकोले तालुक्यातील कळस कृषी प्रदर्शनाचे याहीवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. कळस कृषी प्रदर्शन पीक प्रात्याक्षिक आणि डेअरी एक्सपो 2024 या प्रदर्शनाचे गुरूवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, विठ्ठल लॉन्स परिसर अकोले या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.


कळस कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आ. सुनिल (अण्णा) शेळके (मावळ विधानसभा) यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. किरण लहामटे असणार आहे तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. बाळासाहेब थोरात उपस्थित राहाणार आहे. मुख्य आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे हे उपस्थित राहाणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजेशभाई शाह, सतिष देशमुख, राजेंद्र उर्फ बाबासाहेब देशमुख व मुरली चेरत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.
कळस कृषी प्रदर्शन 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चालू राहणार असून यात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय 400 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात दुग्ध स्पर्धा, कालवड ब्युटी स्पर्धा, पिक प्रात्याक्षिके, बैल गाडी शर्यत तसेच शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. “ग्रामिण भागातील कृषी पुरक उद्योग आणि त्यांचे सबलीकरण” यावर प्रा. डॉ. विशाल सरदेशपांडे ( संस्थापक, सर्वाय सोलुशन अनुबंध सहप्राध्यापक, सितारा आय.आय.टी.मुंबई), डॉ. मुरली चेरत (संस्थापक, वाव लड्डू) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कृषी प्रदर्शनानिमित्त प्रगतशील शेतकरी कृषी सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला असून यावेळी रणरागिणी महिला कृषी उत्पादक व स्वयंसहाय्यता गट पेमगिरी, तुकाराम गुंजाळ (निमज), निलेश दिक्षीत (पेमगिरी), सौ. आरती डुबे (पेमगिरी), सुभाष डुंबरे (पेमगिरी), संदीप गुंजाळ (खांडगाव), भिमाशंकर पांढरे (पेमगिरी), मंगेश गाडे (सावरगाव तळ), संदीप डुबे (पेमगिरी) आदि शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. शाम्प्रोचे संचालक शांताराम डुबे, इंजि. सोमनाथ गोडसे, दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, सागर वाकचौरे, छत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने होऊ घातलेल्या कळस कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पेमगिरी, ता. संगमनेर, कळस बुद्रूक, ता. अकोले ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख