संगमनेरात एटीएम फोडले

संगमनेरात एटीएम फोडले

14 लाखांची रोकड लंपास

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- गणपती विसर्जनाची धामधूम सुरू होती. पोलीस अधिकारी व प्रशासन या बंदोबस्तात व्यस्त होते. चोरटे मात्र भलत्याच कामात व्यस्त राहून त्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरने फोडले. त्यातून सुमारे 14 लाख 10 हजार रुपयांची रोकड या चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील संगमनेर ते नाशिककडे जाणार्‍या एका हॉटेल समोर महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिन आहे. शुक्रवारी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून 14 लाख 10 हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला आहे. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी, ईपीएस कंपनीचे मॅनेजर युगंधर धर्मराज कासार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी संगमनेर शहरात विविध बँकांचे एटीएम मशीन फोडून लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा चोरट्यांनी एटीएम मशिन फोडले आहे. आधी घडलेल्या घटनांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने या चोरट्यांची हिम्मत वाढली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख