संगमनेरात अवतरले अभुतपूर्व भगवे वादळ

हजारोंची उपस्थिती, कडकडीत बंदसह घोषणांनी दुमदूमले रस्ते

महिला भगिणींचा सहभागही उल्लेखणीय

ग्रामीण व शहरी भागातील तरूणाईने केला प्रचंड जल्लोष


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
संगमनेर शहराच्या काही ठरावीक भागात किरकोळ कारणावरून एका समाजाकडून हिंदू समाजाच्या नागरीकांवर दहशत निर्माण केली जाते. प्रसंगी त्यांना मारहाण केली जाते. अनेक वेळा घडलेल्या अशा घटनांनी हिंदू समाजामध्ये रोष वाढत चाललेला होता. त्यातच काही दिवसांमध्ये वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, देशातील विविध भागात हिंदू समाजाच्या मुलींची झालेली क्रूर हत्या यामुळे देखील हा रोष ही खदखद हिंदू समाजमध्ये वाढत चालली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी जोर्वे नाका येथे हिंदू समाजाच्या जोर्वे येथील काही तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेने हिंदू समाजाच्या संतापाचा बाण अखेर फुटल्याने आज त्याचे प्रतिबिंब संगमनेरात आलेल्या भगव्या वादळाच्या रूपाने समोर आले. हजारोंच्या संख्येने संगमनेर शहर, तालुका व अकोले तालुक्यातून आलेल्या नागरीकांनी प्रचंड घोषणाबाजीत आपल्या समाजावरील हा रोष व्यक्त करत या दहशतीला कायमचा पायबंद घालावा अशी मागणी करत अतिविराट असा मोचा काढून प्रशासनासह शासनाचे लक्ष वेधले.


हिंदू समाजावर वारंवार होणार्‍या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट भगव्या मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार आज मंगळवारी सकाळी संगमनेर नगरपालीकेजवळील लालबाहदूर शास्त्री चौकात डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवी शाल आणि हातात भगवा ध्वज घेणारे हजारो तरूण – तरूणी जय श्रीरामच्या घोषणा देत मोर्चासाठी एकवटले. बघता बघता हजारोंचा जमाव या मोर्चात स्वयंस्फुर्तीने या मोर्चात सहभागी झाला. जयश्रीराम सोबतच भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गोमाता की जय, लव्ह जिहाद कायदा झालाच पाहिजे. धर्मांतर बंदी कायदा लागू करा अशा विविध घोषणा देत हा मोर्चा बाजारपेठेतून सुरू झाला. बघता बघता या मोर्चाने विशाल रूप धारण केले. बाजारपेठ मार्गे सय्यदबाब चौक, मेनरोड पर्यंत हा मोर्चा आलेला असतांना लालबाहदूर शास्त्री चौकात मात्र मोर्चासाठी गर्दी वाढत होती.

यावरून या मोर्चाचे विराट स्वरूप लक्षात येते. मेन रोड, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे हा मोर्चा बसस्थानकावर आला. आणि या मोर्चाने या ठिकाणी अति विराट स्वरूप धारण केले. नविन नगर रोडवरील प्रशासकीय भवनासमोर उभारलेल्या भव्य स्टेजवर विश्‍व हिंदू परिषदेचे शंकरराव गायकर व सुदर्शन या राष्ट्रीय चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी तसेच पोलीस अधिकार्‍याची नोकरी सोडून हिंदूत्वासाठी स्वत:ला वाहून घेतलेले सुरज आगे यांनीही यावेळी जोरदार भाषण करत हिंदूंना आपल्या धर्माप्रती जागृत केले. या मोर्चाला संबोधीत केले. उन्हाची प्रचंड तीव्रता असतांना ही अति विराट सभा पार पडली. यावेळी या मान्यवरांनी हिंदू समाजावर वारंवार होणारे हल्ले, देशभर पसरलेले लव्ह जिहादचे जाळे, हिंदू धर्मियांच्या सण-उत्सवावर होणारे हल्ले, वाढणारा दहशतवाद याविरूद्ध संघटीतपणे हिंदू समाजाला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व भेद विसरून हिंदू समाजाने यापुढे लढा देण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन केले. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात लव्ह जिहाद व धर्मांतर बंदी कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.


संगमनेर शहरातील काही भागात एका समाजाची वाढलेली दहशत, हतबल प्रशासन, महिलांची वाढलेली असुरक्षितता यामुळे हिंदू समाजामध्ये मोठा रोष व्यक्त होत होता. जोर्वे येथील तरूणांना मारहाण या नंतर हा रोष आज खर्‍या अर्थाने प्रकट झाला. या संपूर्ण मोर्चाचे नियोजन बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद व सर्व हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्रित येत राजकीय जोडे बाजूला ठेवत हा मोर्चा यशस्वी केला. या मोर्चानंतर शहरात अशा घटना पुन्हा घडणार नाही. पोलीस प्रशासनावर पुन्हा कोणी हात उगरण्याची हिंमत करणार नाही. तालुक्यातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या हिंदू मुली कुणाच्या अत्याचाराला बळी पडणार नाही. ज्या ठिकाणी वारंवार दहशत पसरविली जाते तो परिसर दहशत मुक्त होईल असा मोठा इशारा एक प्रकारे या अति विराट मोर्चातून देण्यात आला.

पोलीस प्रशासनाचे सुयोग्य नियोजन
गेल्या अनेक दिवसांचा खदखदणारा असंतोष आजच्या मोर्चातून व्यक्त होणार होता. यासाठी हजारोंची गर्दी एकवटणार होती. याची पुरेपूर कल्पना असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या संपूर्ण मोर्चाचे सुयोग्य नियोजन केले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर व त्यांच्या संपूर्ण पथकाने या मोर्चाच्या पार्श्‍वभुमीवर कडक बंदोबस्त ठेवत कुठेही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

संगमनेरकरांनी अनुभवला अनोखा मोचा
संगमनेर हे क्रांतीचे व चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या शहराने अनेक मोर्चे, अनेक आंदोलने व दंगली अनुभवल्या आहेत. मात्र आज सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाने आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. एक मोर्चा एक रंग असा निघालेल्या शिस्तबद्ध व तितकाच परिणामकारक असणारा हा मोर्चा संगमनेरच्या इतिहासात कायम राहिल. विशेष करून या मोर्चात ग्रामिण भागातील नागरीकांनी व तरूणांसोबत तरूणींनी घेतलेला सहभाग हा उल्लेखनीय होता. मोर्चाचे नियोजन करणार्‍यांनीही घेतलीली मेहनत सार्थ ठरली.

समनापूरमध्ये तणावपूर्वक शांतता
संगमनेर हे क्रांतीचे व चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. यापूर्वी या शहराने अनेक मोर्चे, अनेक आंदोलने व दंगली अनुभवल्या आहेत. मात्र आज सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाने आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर मोर्चेकरी घरी जात असतांना समनापूर या ठिकाणी काही दुकाने उघडी असल्याने बाचाबाचीतून दोन गटात हुल्लडबाजी झाली. अचानक झालेल्या घटनेने एकाच पळापळ झाली. त्यामुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी तोडफोड झाली यात काहींना मारहाण झाली. मात्र पोलीसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख