महिला दिनानिमित्त टेक्नोरबीटने राबविला अभिनव उपक्रम

उपक्रमाबद्दल टेक्नोरबीट संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील TECHNORBIT संस्थेमध्ये ‘TECHNICAL सखी’ हा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये ‘Technical Poster Presentation’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.


शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, सौ. शरयुताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका रूपालीताई औटी, नंदाताई रहाणे, आदि महिला मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या कार्यकारी संचालिका पुजा रहाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी महिलांसंबंधित विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये स्त्री- सुरक्षा, स्त्री आरोग्य, स्त्री शिक्षण व अधिकार, महिलांच्या विविध समस्या आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे सोडवू शकतो हा प्रामुख्याने यामागील हेतु होता. त्यात स्त्री-पुरुष समानता, स्त्री-भ्रूणहत्या, समाजातील यशस्वी महिला,technical क्षेत्रामधील स्त्रियांचे योगदान तसेच स्त्रीचे दैनंदिन जीवन या विषयांचा देखील समावेश करण्यात आला होता. विविध तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता व त्याचा वापर करून महिलांच्या आयुष्यातील व दैनंदिन जीवनातील समस्यांचे कशाप्रकारे निराकरण करता येऊ शकतो यावर या उपक्रमात भर देण्यात आला.


या ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा गुणवत्तेनुसार निवड करून बक्षिस वितरण करण्यात आले. यात अनुष्का रोकडे, साक्षी बदक, दिशा घुगे प्रथम (सात हजार रुपये), राजश्री दोंड, किर्ती दिघे द्वितीय (पाच हजार रुपये), कल्याणी मुलिंटी, शरवरी हिकणे, अनुजा पानसरे तृतीय (तीन हजार रुपये), साक्षी देशमुख, मयुरी देशमुख, पार्थ देशमुख (एक हजार रुपये) शिवाणी गुंजाळ, निकिता थोरात, ज्ञानेश्‍वरी हारदे, ( एक हजार रुपये), साक्षी गायकवाड (पाचशे रुपये) असे पुरस्कार यावेळी वितरित करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल टेक्नोरबीट संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख