लव्ह जिहादचा प्रयत्न ? दोन परप्रांतीय तरूण ताब्यात

love-jihad-2

सुशिक्षित तरूणीचे अपहरण करण्याचा होता डाव

पब्जीमुळे अनेकांचा गेला जीव, पालक करतात काय?
मोबाईल आता वरदान ठरण्याऐवजी शाप ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पब्जी या घातक गेममुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आता याच गेममुळे मुले मुली सातासमुद्रापार अंतर दूर करून एकत्र येत आहे. मात्र एकमेकांना पुरेसे न ओळखता एकमेकांत जीव गुंतवतात. मात्र त्यातून स्वतः सह कुटुंबाचाही जीव धोक्यात आणतात. या प्रकरणातही या उच्च मुलीने अज्ञानासारखे एका मुलावर विश्‍वास ठेवला आणि मोठे संकट ओढावून घेतले. पालकांनीही आता जागरूक होऊन मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

संगमनेर (प्रतिनिधी)
देशभरात लव जिहाद, धर्मांतर, दहशत यावरून दोन समाजात मोठा तणाव असताना पुन्हा-पुन्हा काही तरुण – तरुणी चुका करताना दिसत आहे. संगमनेरात सकल हिंदुनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले असताना देखील याठिकाणी लव जिहाद सारखे प्रकार घडणे हे म्हणजे सर्व मुसळ केरात जाण्यासारखे आहे. कारण एका परप्रांतीय मुस्लिम तरुणाने हिंदु कॉलेज तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पबजी आणि व्हाटसऍपच्या माध्यमातून हा प्रकार घडल्यानंतर शहरात पुन्हा एकदा मोठा संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व स्थरातून होत आहे. दरम्यान मुलीचे अपहरण करणार्‍या दोघां तरुणांना हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना काल शुक्रवार 16 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कसारा दुमाला परिसरात घडला. याप्रकरणी अकरम शहाबुद्दीन शेख व नेमतुल्ला शेख (दोघे रा. अलीनगर, दरभंग, बिहार) दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.


याबात माहिती अशी की, पीडित तरुणी ही संगमनेर येथील एका नामांकीत कॉलेजमध्ये बी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. ती व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्ट्राग्रामचा वापर करत होती. तसेच पबजी गेममधील बीजीएमआय हा खेळ खेळत होती. त्याच पब्जीवर अकरम शहाबुद्दीन शेख याच्यासोबत मैत्री झाली होती. दोन वर्षापासूनच्या मैत्री नंतर त्याने तीचा नंबर घेतला. त्यावर त्यांची चॅटींग व कॉलिंग देखील होत होती. त्यानंतर त्यांनी संगमनेरात प्रत्यक्ष भेटण्याचे ठरवले. त्यानुसार अकरम शेख हा शुक्रवारी 16 जून 2023 रोजी सकाळी संगमनेर बस स्थानक येथे आला होता. तेथुन अकरम याने पीडितेस फोन करुन सांगितले कि, मी कसारा दुमाला परिसरातील एका रिसार्ट थांबतो तु त्या ठिकाणी भेटायला ये असे सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी देखील अकरम यास भेटण्यासाठी संबंधित रिसॉर्ट येथे गेली. तेव्हा त्याठिकाणी अकरम व त्याचा मित्र नेमतुल्ला असे दोघेही होते. तेथे या तिघांनी गुप्पा मारल्या. परंतु, आपण थोडे लांब निवांत ठिकाणी जावुन बोलू, त्यावर तीने नकार दिला. परंतु त्याने आग्रह केल्यामुळे तिघेजण कासार दुमाला रोडकडे गेले. त्यावेळी आरोपी अकरम व पीडित मुलगी यांच्यामध्ये
गप्पा चालु असताना तो म्हणाला तु माझे सोबत माझ्या गावाकडे बिहारला चल, तु मला खुप आवडतेस, आपण दोघे लग्न करू. त्यावेळी पीडित तरुणीने त्यास नकार देत तुला केवळ मित्र या नात्याने भेटण्यासाठी आलेली आहे. तुझ्या सोबत लग्न करणे किंवा तुझ्या सोबत पळुन जाणे असा कुठलाही विचार माझे मनात नाही असे ठणकावून सांगत तिने घरचा रस्ता धरला. तोच अकरम याने बळजबरीने तिचा हात पकडत तुला माझे सोबत यावेच लागेल. मी तुझ्यावर प्रेम केले आहे. असे म्हणत तिला बळजबरीने ओढत नेले. तुला आमचे सोबत यावेच लागेल. नाही तर आम्ही तुझ्या घरी येवुन तुझे व अकरम याचे प्रेमसंबंध आहे असे सांगून तुझी बदनामी करू अशी धमकी त्याच्या मित्राने दिली. या दोघांचा हेतू लक्षात आल्यानंतर पीडितेने आरडाओरड केली. त्यानंतर रस्त्याने जाणारे काही लोक तेथे जमा झाले. त्यांनी मुलीस विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा उपस्थित जमावाने या दोघांना ताब्यात घेत मुलीची सुटका केली. पीडितेच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा रजि. नं. 488/ 2023 भादवी कलम 354 अ, 366, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये या घटनेतील आरोपी हा 31 मुलींच्या संपर्कात असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. मात्र या आरोपीचा मोबाईल सायबर एक्सपर्ट कडे पाठविण्यात आला असून अद्यापपर्यंत लव्ह जिहाद किंवा त्याचा किती मुलींशी संपर्क होता हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. पवार करीत आहे.
सोमनाथ वाघचौरे
उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख