संजय गांधी निराधार योजनेतून 1 कोटी 60 लाखांचे वाटप

लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास संपर्क साधावा – खताळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना जानेवारी 2024 अखेर 1 कोटी 60 लाख 21 हजार 200 रुपये महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थी खात्यात वर्ग झाले आहे अशी माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.


सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे.
माहे जानेवारी 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती 561 लाभार्थ्याना 8 लाख 34 हजार रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 228 लाभार्थ्यांना 3 लाख 39 हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण 5367 लाभार्थ्यांना 80 लाख 50 हजार 500 रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती 701 लाभार्थ्यांना 10 लाख 51 हजार 500 रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती 325 लाभार्थ्यांना 4 लाख 87 हजार 500 रुपये व श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 4071 लाभार्थ्यांना 52 लाख 58 हजार 700 रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आले आहे.
संगमनेर तालुक्यात काही लोक कागदपत्रे जमा करून प्रकरण करण्यासाठी पैसे घेत आहेत अशा मोठ्या प्रमाणात तक्रारींदेत आहे. त्यांना यामाध्यामातून मी सांगू इच्छितो की प्रकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्याशी, नामदार विखे पाटील जनसंपर्क कार्यालय अथवा भाजप कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान खताळ पाटील यांनी केले

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख