संगमनेरात दहशत पसरविणारी टोळी सक्रिय

पोलीसांचा धाक संपला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात मागील काही दिवसांपासून दहशत पसरविणारी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत हातात घातक शस्त्र बाळगत नागरीकांवर धाक, दहशत निर्माण केली जात आहे. त्यांना हटकणार्‍या किंवा विरोध करणार्‍यांवर प्रसंगी हल्ले केले जात आहे. तर या बाबत तक्रार करणार्‍यांवर हे गुंड प्रवृत्तीचे लोक बदला म्हणून हल्ला केला जात आहे. या गुंडावरील पोलिसांचा धाक कमी झाल्यामुळे त्यांची दहशत वाढली आहे. असेच चित्र सध्या शहरात दिसत आहे. काल अकोले नाका येथे झालेला प्रकार देखील असाच आहे.
शहरातील अकोलेनाका परिसरात एक विक्षिप्त जमावाने शनिवारी रात्री साडे दहा वाजे दरम्यान एका युवकाला बेदम मारहाण केली. अर्धमेल्या अवस्थेत त्या तरुणांला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


संगमनेर तालुक्यातील निमज गावातील विद्यानगर भागातील अनिल सुरेश कुसाळकर (वय 27) हा तरुण शहरातील अकोले नाका येथील पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला मित्रांसोबत उभा असताना काही गुंड प्रवृत्तीचे मद्यधुंद अवस्थेतील युवकांचे टोळके त्याठिकाणी आले. विनाकारण या टोळक्याने अनिल कुसाळकर या तरुणाला दमबाजी करीत, शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. नंतर त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी अनिल कुसाळकर याने जवळच्या पेट्रोल पंपावर आश्रय घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर दगडफेक करीत त्याचा पाठलाग करून या टोळक्याने त्यालागाठून त्याला खाली पाडून डोक्यात, पायावर, हातावर, डोक्यात मारहाण करून जवळ पडलेल्या दगडाचे तुकडे उचलून अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या अनिलला जवळून फेकून मारले. ही सर्व घटना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली आहे. दरम्यान या घटनेतील आरोपींवर याअगोदरही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे. यांची वारंवार असे कृत्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. तरी देखील या गुंडांची पुन्हा असे कृत्य करण्यापर्यंत मजल जाणे हे पोलिसांचे अपयश समजले जाते आहे. अशा प्रवृत्तींना काबूमध्ये ठेवण्यास पोलीस खात्याला अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरीकांत असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख