पंचायत समिती स्तरावरील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – अनिल नागणे

अनिल नागणे

संगमनेर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर. पी. राहणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गट विकास अधिकारी अनिल नागणे व गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांच्याबरोबर शिक्षकांच्या प्रश्‍नाविषयी चर्चा केली. चर्चेला उत्तर देताना वरील आश्‍वासन गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिले.प्राथमिक शिक्षकांना पुढील शिक्षण घेण्यासाठी कार्योत्तर प्रस्ताव, 12 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, शालेय पोषण आहार 2015 ते 19 ऑडिट अंतर्गत कागदपत्रे सादर करतांना येणार्‍या अडचणी, शालेय पोषण आहार अंतर्गत खरेदी करावे लागणारे खाद्यतेल, प्रलंबीत वैद्यकीय व फरक बिले, दर माहे होणार्‍या शिक्षण परिषदेचा वार बदलणे इत्यादी मुद्दे चर्चेत आले.


तालुक्यातील जास्तीत जास्त निकष पात्र शाळा अवघड शाळांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून विधानपरिषद आमदार डॉ. सुधीरजी तांबे गटविकास अधिकारी अनिल नागणे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे के. के. पवार महिला बालकल्याण सभापती मीराताई शेटे काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंदभाऊ कानवडे सभापती सुनंदाताई जोर्वेकर उपसभापती नवनाथभाऊ अरगडे यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख चर्चेत करण्यात आला.सर्वांच्या सहकार्याने शिक्षण विभाग संगमनेर खूप चांगली प्रगती करत आहे. नवोदय मधील यशानंतर शिष्यवृत्ती परीक्षेचे उत्कृष्ट नियोजन होऊन उत्तुंग यश प्राप्त होईल. असा विश्‍वास गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे यांनी व्यक्त केला.


यावेळी चर्चेमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संगमनेर तालुका अध्यक्ष सोमनाथ घुले मा. रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष भोर युवा परिषद अध्यक्ष रावसाहेब शिंदे, बाळासाहेब मोरे ,संजय आंबरे बाळासाहेब गुंजाळ, सत्यवान गडगे बाळासाहेब भागवत यांनी चर्चेत भाग घेतला. शिक्षण विभाग कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक अरुण जोर्वेकर कनिष्ठ सहाय्यक संजय मंडलीक, प्रदीप कुदळ डाटा एंट्री ऑपरेटर संदीप मोरे उपस्थित होते.

शिक्षक परिषदेने तालुक्यातील गुणवंत शाळा व शिक्षकांचा सत्कार करावा अशी मागणी केली असता, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी तात्काळ दखल घेऊन दर महिन्याला चांगले काम करणार्‍या तालुक्यातील तीन शाळांना प्रोत्साहित करण्यात येईल असे आश्‍वासन दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख