सर्व अर्जांची एकित्रत सुनावणी होणार

Dudhganga patsanstha

दुधगंगा घोटाळा – आरोपींच्या अडचणीत वाढ

संगमनेर
संगमनेरातील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच या प्रकरणी दाखल असलेल्या सर्वच अर्जांची सुनावणी एकाच वेळी घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी व संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होताच तत्कालीन तपास अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बँकेच्या व्यवस्थापकासह पाच आरोपींना अटक केली होती. दरम्यान या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे.


मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी स्वतंत्र व उर्वरित आरोपी कुटुंबीयांचा एकत्रित रित्या असे दोन स्वतंत्र अर्ज केले आहे. याशिवाय या प्रकरणातील अन्य एक आरोपी अरुण बुरुड यांच्यावतीने देखील अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जांवर शुक्रवार (8 सप्टेंबर) तारीख ठेवण्यात आली होती. शुक्रवारी या तीनही अर्जासंदर्भात सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्यावतीने म्हणणे दाखल केले आहे. याशिवाय कोठडीत असलेल्या दोघा आरोपींनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. या अर्जावर देखील सरकारचे म्हणणे मागविण्यात आले असून या प्रकरणात मुख्य आरोपी बँकेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या अटकपूर्व विरोध करणारा त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज देखील न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. न्यायालय काही महत्त्वाच्या कामकाजात व्यस्त असल्याने दाखल असलेल्या सर्व अर्जांची सुनावणी एकाच वेळी घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख