संगमनेर बसस्थानकाच्या स्वागताला मोठ्ठा खड्डा

0
1996

अधिकार्‍याचे लक्ष नसल्याचे दुर्दैवी चित्र

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– संगमनेरच्या वैभवात भर घालणारे येथील बसस्थानक सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. बसस्थानकात प्रवेश करताना प्रवाश्यांना नाक मुठीत धरुन प्रवेश करावा लागतो. काल पर्यंत या प्रवाशांच्या स्वागताला घाण, दुर्गंधी, भिकारी होते तर आता मुख्य प्रवेशद्वारासमोरच भला मोठ्ठा खड्डा या प्रवाशांचे स्वागत करत आहे. या खेड्यातून अनेक बस आदळून आत बाहेर जात असल्यातरी त्याकडे कोणत्याही अधिकार्‍याचे लक्ष नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.


भव्य आणि सुसज्ज बसस्थानक अशी ओळख मिळविणार्‍या बसस्थानकाची स्वच्छता, प्रवाश्यांची सुरक्षा, व्यवस्थापन, रस्ते, पाणी यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे या बसस्थानकाला बकालपणाचे स्वरूप आले आहे. दरम्यान बसस्थानक प्रवेशद्वारा समोर पावसामुळे मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून वाहने खिळखिळी करीत आहे. तर दुर पल्ल्याच्या प्रवसावरून आलेल्या प्रवाशाला खडबडून जागे करत आहे. मात्र समोर दिसत असलेला मोठ्या खड्ड्यामुळे प्रशासन काही जागे होतांना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here