सार्वजनिक ठिकाणी नशापाणी करणाऱ्यांवर कारवाई

तळीरामांना पाेलीसांकडून दणका

सार्वजनिक ठिकाणी ऩशापाणी किंवा दहशत केल्यास करणार कठाेर कारवाई

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील विविध मोकळ्या जागा, मैदानावर सायंकाळी, रात्री उशीरापर्यंत वेगवेगळे नशा पाणी करणारे बसत असतात. नशा पाणी करताना त्यांचा आरडाओरड, कधी कधी परिसरातील महिलांची छेडछाड, आपापसांत हाणामारी, विरोध करणार्‍यांना दमबाजी किंवा प्रसंगी मारहाण देखील करण्यात येते. या बाबत अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. परिसरातील नागरिक, महिला, मुली यांना होणार्‍या या त्रासाची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पथकाने शोधमोहीम राबवत कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.


शहरातील मोकळ्या व सार्वजनिक ठिकाणी तरुणांचा धुडगूस, दारुसह आमली पदार्थाचे सेवन व त्यातून निर्माण होणार्‍या समस्या व तक्रारी नंतर शहरातील मोकळी मैदाने तपासणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले असता रविवार दि. 23/7/2023 रोजी देखील सायंकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान शहरातील सर्व मोकळी मैदाने, जागा पोलिसांकडून तपासण्यात आल्या. त्यामध्ये जाणता राजा मैदान, स्वदेश मैदान, गोल्डन सिटी, गंगामाई घाट आदी ठिकाणे तपासण्यात आले.
या ठिकाणावर जे जे लोक नशा करताना, दारू पिताना मिळून आले त्या सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 185, कलम 84, कलम 85 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे.


सदरची कारवाई संगमनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांनी व पोलीस स्टेशन कर्मचार्‍यांनी केली आहे. दरम्यान यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणीही नशापाणी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा ईशारा पोलीसांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख