कोल्हार- घोटी महामार्गावर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात

तरूणाचा जागीच मृत्यु , परिसरात हळहळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
समनापुर –
कोल्हार घोटी राज्य महामार्गावर ट्रकने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने वडगावपान येथील कॉलेजचा तरूण जागीच ठार झाल्याची घटना समनापूर गावातील मश्‍चिद जवळ घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत संजय गडगे हा कॉलेज तरूण आपल्या अ‍ॅक्टीव्हा गाडी नंबर एम. एच. 17 बी. सी. 390 वरून वडगावपान येथे आपल्या घरी जात असताना समनापूर गावाजवळ मळी भरलेला टँकर एम. एच. 12 एच. डी . 7222 या मालट्रकने जोराची धडक दिल्याने कुमार अनिकेत संजय गडगे वय अंदाजे 16 ते 17 हा 11 वीत शिकणारा विद्यार्थी मालट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच ठार झाला. या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे , उप पोलीस निरीक्षक व अन्य सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरील वाहने बाजुला केली. जाम झालेली वाहतुक सुरळीत केली. मालट्रकचा ड्रायव्हर याला ताब्यात घेतले. अनिकेत गडगे याचे अपघाती मृत्यु मुळे वडगाव पान व समनापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख