Sunday, March 26, 2023

दुध टॅंकर आणि दोन दुचाकींची समोरासमोर धडक

चिखलाच्या तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू

चिखलाच्या तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर

आज सकाळी तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

युवावर्ता (प्रतिनिधी) संगमनेरातून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडक बसल्याने भिषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच बळी गेला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत सर्व तरुण तालुक्यातील चिखली येथील रहिवासी आहेत.
या अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20) व निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही रा. चिखली, ता. संगमनेर) अशी आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) असे असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.


सदरची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हार घोटी मार्गावर मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ घडली. संगमनेरातून चिखलीच्या दिशेने आपल्या घराकडे निघालेले चौघे तरुण दोन मोटरसायकल वरुन जात होते. यावेळी मंगळापूर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ अकोल्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या प्रभात डेअरी दुधाच्या टँकरला दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संदीपला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. दरम्यान या अपघातात चिखली येथील तीन तरूणांचा बळी गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे. आज शनिवारी सकाळी या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

मुळासह प्रवरा नदीतून बेसूमार वाळू उपसा सुरूच

संगमनेर - वाळू तस्करी रोखल्याचा दावा महसूल मंत्री व प्रशासन करत असले तरी संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या दोन्ही तीरावर वाळू उपसा...

संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  राष्ट्रीय पातळीवर “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धा उत्साहात

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर येथे आयोजित केलेल्या “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धेचे उदघाटन करताना संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, श्री. नरेंद्र...

संगमनेर महाविद्यालयात दिनांक २३ मार्च ला ‘आझाद हिंदची गाथा’ नाट्याचे प्रस्तुतीकरण

युवावार्ता (संगमनेर-प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार...

मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवारपासून प्रारंभ

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवार दिनांक 23 मार्च पासून...