शिबलापूर -साकूर रस्त्यावर तरसाच्या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्य

बछड्याचा मृत्य

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील शिबलापूर – साकूर रस्त्यालगत बुधवारी सकाळी बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू अवस्थे आढळल्याने प्रथमदर्शनी अज्ञात वाहनाच्या धडकेत बछड्याचा मृत्यु झाल्याची शंका येवून नागरिकांनी वनाधिकार्‍यांना बिबट्याच्या बछड्याची माहिती कळविली असता तातडीने वन कर्मचारी दाखल होत मृत बछड्यास उत्तर तपासणी करिता संगमनेर येथे नेले असता उत्तर तपासणी नंतर बिबट्याचा बछडा हा तरसाच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याचे आढळून आले. येथे काही दिवसापुर्वी तरसाचे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला होता.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी शिबलापूर – साकूर रस्त्यावरील शिबलापूर शिवारातील जिजाबा नागरे यांच्या शेतजमीनीलगत एक बिबट्याचे पिल्लू झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे नागरीकानी थोडे जवळ जाऊन पाहिले असता पिल्लाच्या तोडातून रक्त येऊन पिल्लू मृत झाल्याचे त्याच्यां लक्षात आले. त्यामुळे उपस्थित नागरीकानी वनाधिकार्‍यांना फोन करुन याबाबत वनविभागाला घटनेची माहिती दिली होती. तर भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. माहिती मिळाल्यानतंर वनाधिकारी सुभाष सांगळे, वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक हरिचंद्र जोजर, वनमजूर देवीदास चौधरी वनविभागाचे हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते .


दरम्यान या मृत बिबट्याच्या बछड्याला वनविभागाचे कर्मचारी आपल्या समवेत घेऊन गेले असता त्यांची उत्तर तपासनी केल्यानंतर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यु हा तरसाच्या हल्यात झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी बिबट्याचे पिल्लू मृत पावल्याची घटना घडल्याची माहिती परिसरात पसरताचं घटनास्थळी नागरीकानी मोठी गर्दी केली होती. शिबलापूर, पानोडी, आश्‍वी, उंबरी बाळापूर, पिप्रीं आदिसह प्रवरा नदी तिरावरील गावा्ंमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यासह तरसाची मोठी दहशत निर्माण झाल्याने वनविभागकडून नागरीकानी सावध रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख