दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी साहित्यासह गजाआड

0
1730

संगमनेर शहर पोलीसांची मोठी व धाडसी कामगिरी

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – मागील काही दिवसापासुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्या, घरफोड्या, दरोडे यांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेली होती. गुन्हे करून आरोपी परागंदा होत होते. या चोर, दरोडेखोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असतानाच शहर पोलिसांनी मोठी व धाडसी कामगिरी करत तब्बल सहा अट्टल दरोडेखोरांना शस्त्रसाठ्यासह जेरबंद केले.


संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी जणू उच्छाद मांडला आहे. लाखों रुपयांची मालमत्ता लुटली जात असताना पोलीस प्रशासन ढिम्म पडले आहे अशी टिका वारंवार होत होती. या वाढत्या गंभीर घटनांची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी तपासाचे व कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टु प्लस मधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी, पेट्रोलींग करणे अशा प्रकारच्या समांतर कारवाई चालु करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नसलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचुन चोरट्यांना पकडणेकामी विशेष पथक तयार करण्यात आले होते. तसेच नाकाबंदी लावुन संशयीत वाहने चेक करणे सुरु होते. दरम्यान गुरुवार दिनांक 13.07.2023 रोजी दुपारी चार वाजण्याचे सुमारास मच्छी चौक, पावबाकी रोड येथे नाकाबंदी दरम्यान एक संशयीत चार चाकी वाहन आढळून आले.
यावेळी या वाहनाने नाकाबंदीच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावल्याने या पथकाने सदर वाहनाचा पाठलाग करुन सदर ते पकडले.

त्यांच्या हालचालीमुळे पोलिसांनी या वाहनांची तपासणी केली असता वाहनातील सहा इसमांकडे लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गज, लोंखडी कडे, साडी, मिरची पुड असे घातक शस्त्र आढळून आले. तसेच रोख रक्कम असा एकुण 2,83,150 रुपयांचा ऐवज यावेळी पोलीसांनी जप्त केला. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे तरुण आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. यातील आरोपी पुढील प्रमाणे, संजय मारुती शिंदे वय 25 वर्षे रा. चिसखेड ता. भोताळा जि बुलठाणा, ओकांर शंकर शेगर वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव ता. खामगाव जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सांवत वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव ता. खामगाव जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव ता. खामगाव जि. बुलढाणा, साजन शिवलाल चव्हाण वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव ता. खामगाव जि. बुलढाणा, किशोर महादेव इंगळे वय 21 वर्षे रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव ता .खामगाव जि. बुलढाणा.

Karanjekar


या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांची अधिक चौकशी केली असता महामार्गाच्या कडेला साड्या घालुन गाड्या लुटण्याचे तयारीत असलेबाबत कबुली त्यांनी दिली आहे..
या बाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुरनं 577/2023 भा.द.वि. कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर सहा आरोपींकडे अधिक तपास सुरु असुन त्यांच्याकडून संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोउपनिरी विठ्ठल पवार, पोहेकॉ विजय खाडे, पोना विजय पवार, पोकॉ विशाल कर्पे, रोहीदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार यांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here