डॉ . सौरभ पगडाल यांची फेलोशिप इंग्लंड मधून पुर्ण

0
1869

अवघड व जोखमीच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी संगमनेरकरांना आता पुणे, मुंबईला जाणेची आवशक्यता नाही

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
येथील प्रख्यात अर्थो तज्ञ डॉ. सौरभ पगडाल यांनी इंग्लंड मधील बर्मिंगहॅम येथील दि रॉयल आर्थोपेडीक हॉस्पिटल एन एच एस फाउंडेशन या नामांकित संशोधन संस्थेत जॉईंट रिप्लेसमेंट व आर्थोस्कोपीक सर्जरी मधील फेलोशिप पुर्ण केल्याची माहीती येथील कुटे हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली.
एन एच एस फाऊंडेशन ट्रस्टचे दि रॉयल आर्थोपेडीक हॉस्पिटल हे सन 1909 मध्ये स्थापन झालेले इंग्लंड मधील सर्वात जुने व सुप्रसिध्द सुपर स्पेशालिटी आर्थोपेडीक हॉस्पिटल आहे. तेथील 17 सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये नामांकित व निष्णांत आर्थोपेडीक सर्जनद्वारा दररोज सुमारे 50 मोठ मोठ्या व जोखमीच्या आर्थोपेडीक सर्जरी होत असतात.


इंग्लंडमधील नामांकित संस्थेमध्ये कुटे हॉस्पिटलचे आर्थोपेडीक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी जॉईंट रिप्लेसमेंट व आर्थोस्कोपीक सर्जरीचे महिनाभराचे विशेष प्रशिक्षण तसेच आर्थोस्कोपीक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमधील प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून फेलोशिप मिळवली आहे. यामुळे अवघड व जोखमीच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी संगमनेरकरांना आता पुणे, मुंबईला जाणेची आवशक्यता नाही. अशा शस्त्रक्रिया संगमनेरमध्ये करणे शक्य होणार असल्याचे डॉ. प्रदीप कुटे यांनी सांगीतले आहे.
फेलोशिप यशस्वीरित्या पुर्ण केल्या बद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉ सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, दिलीपराव पुंड, विश्‍वास मुर्तडक, मर्चंट बँकेचे चेअरमन संतोष करवा, गणेश मादास, भाऊसाहेब कुटे, शरदनाना थोरात, सिताराम राउत, रामहरी कातोरे, राणीप्रसाद मुंदडा, उमरभाई बेग, बाळासाहेब देशमाने, हिरालाल पगडाल आदींनी डॉ. सौरभ पगडाल यांचे विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. सौरभ पगडाल हे संगमनेर नगरपरिषदेचे माजी प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांचे सुपुत्र आहेत. डॉ. सौरभ पगडाल यांच्या यशाबद्दल संगमनेरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here