दाम दुप्पटच्या नादात 45 लाखांना फसले दाम्पत्य

45 लाखांना फसले दाम्पत्य

चौघांवर गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
कमी वेळेत दाम दुप्पट पैसे मिळतील असे खोटे आश्‍वासन देऊन विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून प्राध्यापक पती-शिक्षिका पत्नीची तब्बल 45 लाख 23 हजार 512 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात राहणार्‍या सौ. सुरेखा प्रमोद खैरे व त्यांचे पती या फसवेगिरीला बळी पडले. 2017 मध्ये खैरे कुटुंबियांचा संपर्क गणेश राधाकिसन वर्पे, रा. वरवंडी, ता. संगमनेर यांच्याशी आला. त्यावेळी गणेश वर्पे याने मी बिग लाईफ केअर या आर ओ. कंपनीत झोनल मॅनेजर म्हणून काम करतो असे सांगून खैरे यांच्याशी संपर्क वाढविला. मी एफएमएलसी ग्लोबल मार्केटींग हरियाना, दास कॉईन, संकल्प सिद्धी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमीटेड नाशिक, आर. आर. वर्ल्ड फायनान्स कंपनी मुंबई अशा विविध मार्केटींग कंपन्यामध्ये हिस्सेदार म्हणून काम करत असल्याचे गणेश याने सांगितले.

वरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून बंगला, महागड्या गाड्या, पुण्या सारख्या ठिकाणी लोढा कॉम्प्लेक्समध्ये गाळा आहे असे म्हणून त्याची ओळख करून दिली होती. डिसेंबर 2017 मध्ये गणेश वर्पे व मंगल वर्पे यांच्यावर विश्‍वास ठेवून खैरे यांनी 7 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक एफएमएलसी ग्लोबल लाईफ केअर कंपनी हरियाणा या कंपनीत गणेश वर्पे याच्या मार्फतीने गुंतवणूक केली. यानंतर सौ. खैरे यांच्या नावाचा आय डी तयार केला व त्यातून त्यांच्या बँक खात्यावर महिन्याला रिटर्नस येवू लागले. त्यामुळे खैरे यांचा ग्लोबल लाईफ केअर कंपनी, गणेश वर्पे, मंगल वर्पे, रेश्मा देसाई व महेश मांढरे यांच्यावर विश्‍वास वाढला. काही दिवसांनी गणेश वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे व मंगल वर्पे यांनी खैरे कुटुंबीयांची भेट घेऊन तुम्ही दास क्वाईन क्रीप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला एका वर्षात दुप्पट पैसे करून देतो. असे त्यांनी आम्हाला लॅपटा प्रेझेंटेशन देवून पटवून देवून विश्‍वास संपादन केला.

त्यामुळे खैरे यांनी दि. 2 जानेवारी 2020 रोजी प्रमोद खैरे यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यावरून गणेश वर्पे यांच्या बँक खात्यावर 5 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर गणेश वर्पे याचे मालकीची आदीराज एंटरप्रायजेस या खात्यावर दि. 14 मार्च 2018 रोजी खैरे यांच्या एचडीएफसी बँक खात्यामधून 2 लाख 30 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफार केली. तसेच दि. 14 मार्च 2018 रोजी दहा लाख रुपयांची रक्कम खैरे यांनी आदीराज एंटरप्रायजेस मालदाडरोड येथील कार्यालयात गणेश वर्पे, रेश्मा देसाई व महेश मांढरे यांना मिळून दिली होती. सर्व रकमेतून दास काईन क्रीप्टो करन्सी या क्रीप्टो करन्सी मधून एक्झीक्युटीव्ह लाससन्स व प्रेसिडेंट लायसन्स खरेदी केलेले आहे असे वर्पे याने खैरे यांना सांगितले. त्यानंतर गणेश वर्पे याने 6 महिन्यांनी एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले व पुढील 6 महिन्यात वाईनची किंमत वाढली की सर्व रक्कम दुप्पट स्वरूपात. देतो असे सांगून खैरे यांच्या पैशांची हमी घेतली होती.

गणेश वर्पे याने मी संकल्प सिद्धी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमीटेड नाशिक या कंपनीत पार्टनर असून तुम्हाला या कंपनीतही चांगला फायदा करून देतो असे सांगतिले म्हणून आम्ही गणेश वर्पे संकल्प सिद्धीच्या बँक खात्यावर दि. 17 जानेवारी 2019 रोजी 7 लाख 74 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. गणेश वर्पेचा सहभाग असलेली आर. आर, वर्ल्ड फायनान्स सव्हींसेस कंपनी मुंबई याचे बँक खात्यावर दि. 7 मार्च 2020 रोजी 14 लाख रुपये खैरे यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावरून ट्रान्सफर केली. सदरच्या दोन्ही कंपन्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करित असतात दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी गणेश वर्पे याचे कोटक महिंद्रा बैंक खात्यावर माझा कोटक महिंद्रा बँक खात्यावरून 4 लाख रुपये आणि दि. 30 सप्टेंबर 2020 रोजी गणेश वर्पे याचे आयसीआयसी बँक खात्यावर 3 लाख रुपये प्रमोद खैरे यांच्या एच डीएफसी बँक खात्यावरून रक्कम ट्रान्सफर केली आहे. त्यानंतर 24 जून 2020 रोजी मंगल वर्पे हिचे खात्यावर 4 लाख रुपये आर. आर. वर्ल्ड कंपनीत पेमेंटची डीलीव्हरी करण्यासाठी व इतर मार्केटींग मधील अडचणीसाठी दिले होते. सौ. खैरे या आपल्या सासरी बुरुडगाव रोड अहमदनगर येथे असताना गणेश वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे हे 2 ऑगस्ट 2020 अहमदनगर येथे गेले होते. त्यावेळी पुन्हा 15 लाख रुपये आर. आर. वर्ल्ड कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देण्यात आले. त्यावेळी सदरची रक्कम योग्य परताव्यासह परत करण्याची हमी घेऊन सदर कंपनीचे प्रोमीसरी नोट व चेक दिले होते. परंतु कंपनीचे धनादेश न वाटल्याने खैरे कुटुंबीयांनी ही रक्कम वारंवार मागितली.


दि. 26 ऑक्टोबर 2021 रोजी रेश्मा देसाई यांच्या बँक खात्यामधून 3 लाख रुपये प्रमोद खैरे यांच्या बँक खात्यावर आले. दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी गणेश वर्पे यांचे बँक खात्यावरून 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम प्रमोद खैरे यांच्या खात्यावर आली. परतावा मिळत नव्हता त्यामुळे खैरे दाम्पत्याने गणेश वर्पे, मंगल वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे यांना वारंवार पैशाबाबत विचारणा केली. त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही व तुम्हाला तुमचे पैसे लवकर मिळतील असे खोटे आश्‍वासन दिले. डिसेंबर 2017- पासून ते ऑगस्ट मंगल गणेश वर्पे, रेश्मा आबासाहेब देसाई, महेश विजय मांढरे 2022 दरम्यान गणेश राधाकिसन वर्पे, सौ. यांनी खैरे पती-पत्नीची फसवणूक केली. सौ. सुरेखा खैरे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख