डंपरखाली चिरडून चिमूरडी ठार

चिमूरडी ठार

मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पठाण कुटूंबीयांवर शोककळा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
घरासमोर लावलेला डंपर मागे घेत असताना चालकाचा निष्काळजीपणा चांगलाच महागात पडला. चार वर्षाची चिमुरडी खेळता खेळता या डंपरखाली आल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना काल सोमवार 27 रोजी सायंकाळी 7.30 वा. संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील माळवाडी वस्तीवर घडली.
याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मेंढवन (माळवाडी) येथे रमजान अहमद पठाण यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीचा डंपर (क्रमाक- एम 04 एफडी 4176) उभा होता. सायंकाळी 5.30 च्या सुमारास डंपर चालक राजेंद्र भागवत बढे हा नेहमीप्रमाणे सदर डंपर मागे घेऊन जात असतांना अंगणात खेळणारी चार वर्षांची चिमुरडी माही आजिज पठाण ही या डंपरखाली आली. या अपघातात तीला गंभीर दुखापत झाल्याने त्यात तीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चालक राजेंद्र भागवत बढे याच्यावर भादवि कलम 304, 279, 333, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापस पोलीस निरीक्षक ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरिक्षक विजय खंडीझोड करत आहे.स्वत:च्याच अंगणात लावेल्या स्वत:च्याच मालकीच्या वाहनाखाली घरातल्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पठाण कुटूंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख