छोट्याशा डासांचा उपद्रव बनलाय संगमनेरकरांची डोकेदुखी

0
808

आधी झिका आता डेंग्यू, मलेरियाने नागरिक जायबंदी

मुलांचे आरोग्य कसे संभाळावे

पावसाळ्यातील वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढते. त्यातच लहान मुलांवर त्याचा लवकर परिणाम होतो. गारवा आणि ओलसरपणामुळे मुलांना व्हायरल इन्फेक्शनचा जास्त धोका असतो. त्यातच साथीच्या रोगांना लहान बालके लवकर बळी पडतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात मुलांना पावसात भिजू देऊ नये. आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ देऊ नये. पाणी उकळून थंड करून प्यावे. स्वच्छ व ताजे अन्न द्यावे. उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. मुलांचे योग्य लसीकरण कराव

डॉ.संदीप होन (बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, संगमनेर)

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – जून 2024 मध्ये वातावरणामध्ये अनेक बदल झाले. तुरळक प्रमाणात पाऊस आणि दमट हवामानामुळे संगमनेरमध्ये डासांचे प्रमाण अचानक वाढले. संगमनेरमध्ये जून महिन्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला मात्र त्याची वाच्चता जास्त झाली नाही. उपनगरांमध्ये उघड्यावर काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने पावसामुळे त्या ठिकाणी अक्षरशः कचराकुंडी झाली. अनेकांचे प्लॉट रिकामे असल्याने तेथे डुकरांनी आपली वसाहत बनवली. हवामानातील बदल, घाणीचे साम्राज्य, लोकांची स्वच्छतेबाबतची अनास्था यामुळे डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विविध प्रकारचे केमिकल, कॉईल, अगरबत्ती असे काही लावले तरी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रतिबंधाला डास जुमानताना दिसत नाहीत.
डासांच्या या वाढत्या प्रमाणामुळे झिका संगमनेरमध्ये धडकला आता त्यानंतर अनेकांना मलेरिया आणि विशेषकरून डेंग्यूने ग्रासले आहे. डेंग्यू हा रक्त शोषणार्‍या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. डेंग्यू किंवा डेंगी – हा शब्द आलाय स्वाहिली भाषेतल्या ‘घर-वळपसर शििे’ या शब्दांवरून. डेंग्यूला इेपशलीशरज्ञ ऋर्शींशी अर्थात हाडं मोडून काढणारा ताप असेही म्हटले जाते. या तापामुळं काही जणांना हाडं आणि स्नायूत खूप दुखते. डेंग्यूचं निदान छड1, खसच आणि खसॠ या रक्ताच्या तीन चाचण्या करून होते.
डेंग्यूची प्रमुख लक्षणे – डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत – ऊशपर्सीश ऋर्शींशी ऊऋ आणि ऊशपर्सीश कशोीीहरसळल ऋर्शींशी ऊकऋ. पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणं दिसू शकतात. डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत असतात. दुसर्‍या प्रकारच्या तापामुळे अर्थात ऊकऋ मुळे तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा, अशी लक्षणं दिसू शकतात.
अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असते.
डेंग्यूवर उपचार – डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. असं आयएमए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात. रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार म्हणजे ताप किंवा अंगदुखी पाहून तशी औषधं दिली जातात. डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांतीची सर्वांत जास्त गरज असते. तसंच भरपूर पाणी पिण्याचीही, म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लीटर पाणी प्यायला हवे. तसंच रुग्णानं साधा आहार घ्यावा, डेंग्यू तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते. साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तात 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स असणे गरजेचं असते. जर प्लेटलेट्सचं प्रमाण 10 हजारांच्या खाली गेलं तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात, साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण 3 ते 8 दिवसांत बरा होतो.
डेंग्यू होऊ नये म्हणून काय करावे – डेंग्यू पसरवणार्‍या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे विशेष लक्ष ठेवा. तिथे खूप दिवस पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या.
घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळणे महत्त्वाचे असते. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणे आवश्यक आहे.
थकज च्या आकडेवारीनुसार दरवर्षी 39 कोटी लोकांना डेंग्यूची लागण होत असावी असा अंदाज आहे. जगभरात डेंग्यूमुळे दरवर्षी सुमारे 25 हजार मृत्यू होतात. आणि यापैकी 70 टक्के रुग्ण आशियातले असतात. हे प्रमाण मलेरियामुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा कमी असले तरीही हे आजारपणाचं एक मोठं कारण आहे, एक मोठी समस्या आहे, असं जागतिक डास कार्यक्रमाचे प्राध्यापक कॅमरॉन सिमन्स सांगतात. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.
वाढत्या आजारामुळे संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने शहरात चांगली औषध फवारणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत असल्यातरी नागरिकांनी आपआपल्या जागेची स्वछता ठेवावी. जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष दिल्यास बरेच प्रमाण कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here