पोलीसांकडून 83 गोवंश जनावरांना जीवदान

0
1588

8 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त – 5 जणांवर गुन्हा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असताना संगमनेरातील अवैध कत्तल खाण्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तली अजूनही सुरूच आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील कुरण बरोबर आता वडगावपान शिवारातही मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरांची अवैधपणे कत्तल केली जात असल्याचे समोर आले आहे. तालुका पोलिसांनी वडगावपान शिवारातील कोल्हेवाडी रोड या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल 83 जनावरांची सुटका करण्यात आली तर तीन वाहनांसह एकूण आठ लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींसह तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी माहिती अशी की, वडगावपान शिवारातील कोल्हेवाडी फाटा येथील हॉटेल साई पॅलेस पाठीमागे असणार्‍या मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास या ठिकाणी छापा घालून पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एक लाख दहा हजार रुपये किमतीचे 83 जनावरे व सात लाख 28 हजार रुपये किमतीचे दोन पिकप व एक छोटा हत्ती असे तीन वाहने जप्त करण्यात आली
याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र महादवे पालवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रविंद्र मुरलीधर थोरात (रा. वडगावपान, ता. संगमनेर) फारूक युसूफ सय्यद (रा. संगमनेर) (फरार), छोटा हत्तीवरील चालक (फरार) महिंद्र पिकअप अज्ञात चालक (फरार), अज्ञात पिकअप चालक अशा 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता कत्तलखान्याचे लोन ग्रामिण भागात पसरले असून गोवंश हत्याबंदी कायदा पायदळी तुडवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here