जेसीबी लावून सरस्वती पतसंस्थेचे कंपाऊंड तोडले

0
1614

सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्याची संस्थेची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
बिनशेती असलेली व कायदेशीररित्या घेतलेल्या स्वमालकीच्या जागेत पतसंस्थेने बांधलेले तारेचे कंपाऊंड काही स्थानिक नागरीकांनी धाक दडपशाही करून जेसीबीच्या साह्याने उखडून टाकले. ही घटना तालुक्यातील निमज येथील सरस्वती ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत 26/9/23 रोजी सायंकाळी घडली. याबाबत पतसंस्थेचे व्यवस्थापक सुदाम ज्ञानोबा गवांदे रा. झोळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. मात्र या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत गवांदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरस्वती पतसंस्थेची मौजे निमज येथे 0.04 आर बिनशेती प्लॉट आहे. त्या संपुर्ण स.नं. 139/20 चे प्लॉटमध्ये संस्थेने 1 वर्षापुर्वी चारही बाजुने लोखंडी पोल उभे करून तारेचे कंपाउंड केलेले आहे. सदरचे तार कंपाउंड राजेंद्र गणपत दातीर, सुलोचना भगवंत पाबळे, सिंधुबाई प्रकाश खाटेकर, रेखा शंकर दातीर, शंकर गजानन दातीर सर्व रा. निमज ता. संगमनेर यांनी ता. 26/09/2023 रोजी सायंकाळी पाऊस चालु असतांना विष्णु शंकर बिबवे रा. निमज यांचा जेसीबी आणून तार कंपाउंड तोडत होते. त्यावेळी संस्थेचे चेअरमन बादशहा दत्तु गुंजाळ व संचालक अशोक गणपत डोंगरे यांनी जे.सी.बी. ड्रायव्हरकडे विचारणा केली असता, ड्रायव्हरने वरील इसमांचे नावे सांगितली. त्यावेळी चेअरमन व संचालक यांनी काम बंद करण्यास सांगितल्याने जे.सी.बी. त्या ठिकाणाहुन निघुन गेला. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी संस्थेचे व्यवस्थापक गवांदे व कर्मचारी अमोल तान्हाजी डोंगरे हे तोडलेल्या कंपाउंडचे फोटो काढत असतांना तेथे सागर आण्णासाहेब डोंगरे यांनी जागेचे फोटो काढायचे नाही, येथुन निघुन जा असा दम दिला. राजेंद्र गणपत दातीर, सुलोचना भगवंत पाबळे, सिंधुबाई प्रकाश खाटेकर, रेखा शंकर दातीर, शंकर गजानन दातीर सर्व रा. निमज व जे.सी.बी. मालक विष्णु शंकर बिबवे यांनी संस्थेच्या मालकीच्या जागेतील असलेले तारकंपाउंड जे.सी.बी.च्या सहाय्याने तोडुन टाकुन संस्थेचे फार मोठे आर्थिक नुकसान केलेले आहे. तसेच सागर आण्णासाहेब डोंगरे यांनी संस्थेचे कर्मचारी अमोल डोंगरे यांना दम दिला आहे. तरी सदर गुन्हयाची चौकशी होऊन सदर इसमांविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संस्थेच्या वतीने श्री. गवांदे यांनी तालुका पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
दरम्यान बँकेच्या जागेचे मोजणी करणारे श्री. गोसावी यांनी चुकीच्या पद्धतीने मोजणी केली असून कोणत्याही पंचांच्या सह्या घेतल्या नाहीत. नकाशाची खातरजमा करून मोजणी करणे गरजेचे होते. मात्र बनावट कागदपत्र तयार करून मोजणीचा हिस्सा नंबर 139/19/1 हा हिस्सा नंबर 139/20 च्या जागेवर दाखविला आहे. ही केलेली मोजणी चुकीची असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here