“वॉकेथॉन” चालण्याच्या स्पर्धेत ५०० स्पर्धकांचा सहभाग

“वॉकेथॉन”

सर्वच वयोगटातील स्पर्धकांच्या सहभागाने “विन डायबेटीज” मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन 3 किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय 30 वर्ष ते 92 वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. 500 पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धकांना टी शर्ट, कॅप, मोफत रक्ततपासणी, एनर्जी ड्रिंक, मेडल, रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देण्यात आले. मधुसूदन नावंदर, सौ. कडलग, राजकिशोर कासट, सरला आसावा, विवेक कासार, सौ. परदेशी यांसहित २१ जणांना पारितोषिके देण्यात आली.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी, अतुल अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख ला. डॉ. अमोल कृ. वालझाडे, ला. सुदीप हासे, डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. सुशांत गिरी यांनी काम पाहिले तर ला. देविदास गोरे, ला. महेश डंग, ला.सुमित मणियार, माधवबाग क्लिनिक हेड डॉ.कल्पिता वालझाडे, निमा अध्यक्ष डॉ. विनायक नागरे, सचिव शरद गुंजाळ, ला. जितेश लोढा, हरमित डंग, ला. पुष्पा गोरे आणि सर्व लायन्स सदस्यांनी काम बघितले.


डॉ.विकास करंजेकर, डॉ. अमोद कर्पे, डॉ. सौरभ गीते, डॉ. सुभाष मंडलिक, डॉ. श्याम दुर्गुडे, डॉ. विपुल भुजबळ, डॉ. रविन चांडक, डॉ. संजय मेहता, डॉ.सुधाकर पेटकर, डॉ. निशांत इंगळे, डॉ. रविंद्र गुंजाळ, डॉ. अतुल देशमुख, डॉ. संदीप वामन, डॉ. संतोष खतोडे, डॉ. संदीप अरगडे, डॉ. किरण नेहे, डॉ. महेंद्र कोल्हे, डॉ. पांडुरंग जाधव, डॉ. निलेश सातपुते, डॉ. संगीता रसाळ, डॉ. शुभदा देशमुख, डॉ. भारती गुंजाळ, डॉ. पूनम कचेरिया, डॉ. वैशाली कुलकर्णी, डॉ. रुपाली ताम्हाणे, डॉ. रोहिणी करंजेकर, डॉ. खैरनार, डॉ. रुपाली जोंधळे, डॉ. सविता वामन, डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. सुनीता राऊत, डॉ. मिर्झा या सर्व डाॅक्टर्सच्या टीमने या स्पर्धेसाठी मोलाची साथ दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख