नाशिक मर्चंट बँकेत चार कोटींचा बनावट सोनेतारण घोटाळा

तब्बल 136 जणांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शहरात असणार्‍या दि नासिक मर्चंटस को-ऑपरेटीव्ह बँक लि. बँकेत सुमारे चार कोटी रुपयांचा सोने तारण घोटाळा उघडकीस आला आहे. यात बँकेचे माजी व्यावस्थापक, व्हॅल्युअर आणि कर्जदार यांनी संगनमत करून 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार गेल्या दोन वर्षात घडला असून या प्रकरणात तब्बल 136 खातेदारांनी बनावट सोने ठेवून कर्ज काढले आहेत. या प्रकरणी बँकेच्या माजी अधिकार्‍यांसह एकूण 136 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अकोले, संगमनेर, नाशिक, पुणे अशा ठिकाणच्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सामावेश असून या खळबळजनक घटनेमुळे बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत बँकेचे विद्यमान व्यवस्थापक निलेश वसंत नाळेगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 1 नोव्हेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत योगेश बाळासाहेब पवार हे संगमनेर शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणुन काम पहात होते. त्यांच्या काळात या शाखेमार्फत सोने तारण कर्ज दिले जात होते. हे कर्ज ग्राहकांचे सोने बँकेत गहाण (तारण) ठेऊन दिले जाते. सदर सोने गहाण ठेवतांना अधिकृत व्हॅल्युअर मार्फत सोन्याचे बँक व्हॅल्युएशन करून घेतले जाते. तसा मुल्यांकनाचा शेरा व दाखला घेऊन बँक व्हॅल्युअरने दिलेल्या सोन्याच्या मुल्यांकनाचे आधारे कर्ज दिले जाते. अशा प्रकारे सोन्याचे दागिन्यांचे मुल्यांकन मुल्यांकन करण्यासाठी बँकेने जगदिश लक्ष्मण शहाणे याला अधिकृत व्हॅल्युअर म्हणून दि. 19 डिसेंबर 2014 रोजी नियुक्त केलेले होते. त्याने केलेल्या मुल्यांकनाच्या आधारे बँकेने विविध ग्राहकांना कर्ज दिलेले आहेत. संगमनेर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सोने तारण कर्जात काही सोने खोटे निघाल्याचे अधिकार्‍यांना समजले होते. त्यामुळे त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बँकेने कर्जदारांच्या उपस्थितीत सोन्याची तपासणी केली. तसेच अनुपस्थित ग्राहकांचे व्हीडीओ शुटींगमध्ये सोन्याची तपासणी बँकेचे दुसरे पॅनल व्हॅल्युअर यांचे मार्फत करण्यात आली. यात कर्जापोटी ठेवलेले दागिने हे सोने नसुन खोटे असल्याचे आढळून आले. या फसवणुकीमध्ये बँकेचे व्हॅल्युअर जगदिश शहाणे व कर्जदार यांनी संगनमताने खोटे दागिने ठेऊन, विश्‍वासघात करून, बँकेची फसवणुक केली. या फसवणूकीत 136 खातेदारांचा समावेश असून आहेत त्यापैकी 12 खातेदारांनी त्यांचे कर्ज खाते बंद केलेले असून आता 124 खातेदार शिल्लक आहेत. यांच्याकडून 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपये येणे आहे. त्यामुळे, बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी योगेश बाळासाहेव पवार यांचे कार्यकाळात सदर प्रकार घडला असल्याने त्यांच्यासह 153 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


बनावट सोने ठेवणारे कर्जदार
अकिला आजीज शेख (रा. कुरण, ता. संगमनेर), राजेश विश्‍वनाथ पवार (रा. कुरण), सचिन मरनलभाऊ होलम (रा. सय्यद बाबा चौक), सागर भारत मंडलिक (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), आसिफ अल्लाउद्दीन शेख (रा. मोगलपुरा संगमनेर) ताराबाई रावजी घुगे (रा. संगमनेर), मंगेश चंद्रकांत ढोले (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) वैभव प्रकाश वाकचौरे (हंगामनगर), रमेश बाबुराव गाडे (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) नितीन किसन साळुंखे, सविता दीपक जाधव (रा. मालदाड रोड, संगमनेर), सुधीर रावसाहेब घुगे (रा. अमृतनगर, संगमनेर), अमोल पोपट खेंगळे (रा. परदेशपुरा, संगमनेर), कैलास रामनाथ शिरसाठ (घुलेवाडी, संगमनेर), बाळासाहेब विष्णू मेढे (घुलेवाडी), दीपक बादशाह पवार, (निळवंडे. ता. संगमनेर), स्वाती अनिल मंडलिक (रा. मालादड रोड), मनोज कचरु परदेशी (रा. संगमनेर), योगेश शंकर सूर्यवंशी (रा. ढोलेवाडी, संगमनेर), संजय दिलीप म्हैसे (रा. घोडेकरमळा, संगमनेर), शशिकला विश्‍वनाथ पवार (रा. घुलेवाडी), रवींद्र रमेश राजगुरु (रा. मालादड रोड, संगमनेर), विशाल काशिनाथ वाकचौरे ( घुलेवाडी, संगमनेर), रुपाली जीवन परदेशी (रा. देवाचा मळा, संगमनेर), अजयकुमार भाऊसाहेब थोरात (रा.वडगावपान), योगेश रामनाथ वाकचौरे (रा. धांदरफळ बु. ता.संगमनेर), संदीप भाऊसाहेब सानप (रा. कर्‍हे. ता. संगमनेर), प्रकाश मारुती तुपसुंदर (रा. घुलेवाडी), संदीप नंदू काळंगे (रा. संगमनेर), प्रतिक नानासाहेब केरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), शशिकांत मिनानाथ पांडे (रा. घुलेवाडी ), योगेश दत्तात्रय जाधव (रा. संगमनेर), प्रसाद संजय वर्पे (रा. घुलेवाडी), ज्ञानेश्‍वर ठकाजी यरमाळ (रा. संगमनेर खुर्द), रंजना गोरख पावबाके (रा. संगमनेर), शाम प्रल्हाद डहाळे (रा. संगमनेर), लक्ष्मण विठ्ठल राऊत (रा. घुलेवाडी), ज्योती दीपक कुलथे (रा. संगमनेर), मीना दिलीप भारती (रा. संगमनेर), आयुब उस्मान पठाण (रा. लखमीपुरा, संगमनेर), शरद मारुती परबत (रा. ढोलेवाडी, संगमनेर) राहुल ज्ञानेश्‍वर गुरकुले (रा. संगमनेर खुर्द), उषा एस दुधवडे (रा. सावरगाव, ता. संगमनेर), दीपक दादू आव्हाड (रा. मलदाड रोड, संगमनेर), निकिता विशाल वाकचौरे (रा. घुलेवाडी), प्रियंका राजेंद्र वाकचौरे (रा. घुलेवाडी),


मारूती अण्णासाहेब मंडलिक (रा. संगमनेर खुर्द), लखन शांताराम कडलग (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), गोरक्ष आर. गाडेकर (रा. मानोली, ता. संगमनेर) प्रमोद सुदाम वाव्हळ (रा. घुलेवाडी), मारुती लिंबा खेमनार (रा. डिग्रस, ता. संगमनेर) मनोज मच्छिंद्र ढमाले (रा. घुलेवाडी, नवनाथ चंद्रभान खंडाळे (रा. डिग्रस, ता. संगमनेर), रवींद्र ज्ञानदेव जाधव (रा. पानोडी), राहुल शिवाजी गायकवाड (रा. घुलेवाडी), साक्षी सतीश पोटे (रा. घुलेवाडी), संदीप बाळासाहेब गुळवे (रा. वेल्हाळे, ता. संगमनेर), रंजना गोरख पावबाके (रा. संगमनेर), विजय रामनाथ पावसे (रा. हिवरगाव पावसा, संगमनेर), सुरज उत्तम जाधव (रा. घुलेवाडी), सुनील खंडू बटवाल, ( रा. ढोलेवाडी, संगमनेर), शालिनी प्रमोद वाव्हळ (रा. घुलेवाडी), मिनिनाथ राजाराम सानप (रा. निमोण ता. संगमनेर), सिद्धार्थ संतू दारोळे (रा. संगमनेर), भानुदास यशवंत ढगे (रा. घुलेवाडी), मंगेश रावसाहेब घुगे (रा. नांदूरशिंगोटे ता. सिन्नर), मनोज राजेंद्र बांगर (रा. जवळे कडलग ता. संगमनेर), विनोद भानुदास ढगे (रा. शिंदवड, ता. अकोले), ज्योत्स्ना प्रशांत भुजबळ (रा. संगमनेर), जय तपेंद्रबहादूर सुनार (रा. संगमनेर), अरविंद मारुती पावसे (रा. हिवरगाव पावसा), प्रकाश विश्‍वनाथ पवार (रा. घोडेकर मळा), स्वाती प्रकाश पवार, (रा. साईनगर, संगमनेर), चंचल रमेश गाडे (रा. तेलीखुंट चौक, संगमनेर), काजल प्रतिक केरे (रा. निळवंडे), विजय भास्कर अवचिते, सुरेश फकिरा भालेराव (रा. मालुंजे, संगमनेर), संदीप गोरक्ष अवचिते (शिबलापूर रोड, संगमनेर), सोमनाथ भीमराज जाधव (रा. डिग्रज, ता. संगमनेर), सचिन जगन्नाथ अवचिते (रा. मालुंजे संगमनेर), गजला आयुब पठाण (रा. देवी गल्ली, संगमनेर), नवनाथ भरत घोडेकर, मच्छिंद्र एकनाथ मंडलिक, सुषमा मंडलिक (रा. संगमनेर), रितेश संतोष साळवे (रा. घुलेवाडी), रंजना प्रकाश तुपसुंदर (रा. घुलेवाडी), अक्षय रमेश गाडे (रा. तेलीखुंट शिंपीगल्ली, संगमनेर), कृष्णा भाऊसाहेब गाढवे (रा. घुलेवाडी), रवींद्र दत्तू घोडेकर, किरण रघुनाथ रहाणे, नवनाथ मारुती ढोले (रा. घोडेकर मळा), डिंपल संतोष वालझाडे ( रा. रंगार गल्ली संगमनेर), कोमल संजय भोसले (रा. वाकड. पुणे), दानिश अय्युब पठाण, योगिता राहुल गुरुकुल, संतोष माधव लहरे (रा. घुलेवाडी), गणेश भाऊसाहेब अवचिते (रा. गोसावी मळा, मालुंजे, ता. संगमनेर), माधव दादा लहारे, नामदेव भीमराज जाधव (रा. मालुंजे ता. संगमनेर), सुनील गंगाधर ताम्हाणे (रा. अकोले नाका, संगमनेर), महेश जोशी (रा. घुलेवाडी), राजू एकनाथ बोरकर, उषा माधव लहारे, ज्योती महेश जोशी, मिना कैलास गोफणे (रा. संगमनेर खुर्द), गणेश सूर्यभान खेमनार (रा. डिग्रस) सचिन मोहन उपरे, मुकुंद मुरलीधर उपरे (रा. माळीवाडा, संगमनेर), कैलास सोमनाथ गोफणे (रा. सातपुते मळा, संगमनेर), राहुल बीजराज गुळवे (रा. वेल्होळे, संगमनेर), भाऊसाहेब जगन्नाथ पवार (रा. ओझर खुर्द, संगमनेर), संतोष सखाराम सूर्यवंशी (रा. घुलेवाडी, संगमनेर), अमृतराज किसन वाघमारे (रा. संगमनेर), संजय कुंडलिक साळवे, सुनील रघुनाथ अवचिते (रा. मालुंजे, संगमनेर), विशाल विठ्ठल कुंडल, (रा. घुलेवाडी), रवी महेश श्रीवास (रा. वाडेकर गल्ली संगमनेर), विजय बाळासाहेब फुलसुंदर (रा. मानोली कोकणगाव, संगमनेर), सुलताना अय्युब पठाण (रा. लखमीपुरा, संगमनेर), अनिल राजाराम पवाबाके, किशोर धोंडीराम रगडे, नंदा रमेश गाडे, राहुल ज्ञानेश्‍वर गुरूकूले, योगीता योगेश गुधलकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संगमनेरसह अनेक गावातील नागरीकांचा यात समावेश असल्याने या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख