–
विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देशमुख हॉस्पिटलचे उद्घाटन
एकाच छताखाली सर्व आजारांच्या सुविधा येथे मिळणार
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर –देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे संगमनेरचे वैभव आहे. एकाच छताखाली सर्व आजारांच्या सुविधा येथे मिळणार असल्याने संपूर्ण नगर-नाशिक जिल्ह्यातून येणार्या रूग्णांना बाहेरगावी उपचाराला जाण्याची गरज पडणार नाही असे गौरवोद्गार मा. महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले. हॉस्पिटलचे उद्घाटन आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. सुधीर तांबे होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आ. सत्यजित तांबे, आ. डॉ. किरण लहामटे, मा. आ. वैभव पिचड, मा. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, एकवीरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, उद्योजक आबासाहेब थोरात, वसंत देशमुख, एस. झेड. देशमुख, सेवानिवृत्त सनदी अधिकारी निर्मलकुमार देशमुख, सेवानिवृत्त कृषी संचालक के. व्ही. देशमुख, बीडचे उपजिल्हाधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे, डॉ. भानुदास डेरे, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, अॅड. नईम इनामदार, डॉ. बी. जी. बंगाळ, संपतराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. देशमुख परिवारातील सर्व नातेवाईक, डॉक्टर्स, मित्र परिवार, हितचिंतक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.बाळासाहेब थोरात यांनी अकोले पंचायत समितीचे माजी सभापती कै.अॅड. सुगंधराव दामोदर देशमुख तसेच देशमुख परिवाराच्या सामाजिक, वैद्यकीय कार्याचे कौतुक केले. संपूर्ण देशमुख परिवाराने वैद्यकीय सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. डॉ. अनिल सुंगधराव देशमुख यांनी 1988 पासून संगमनेरकरांच्या वैद्यकीय सेवेसाठी भरीव योगदान दिले असून डॉ. शुभदा यांनी त्यांना चांगली साथ दिली. पुढील पिढी डॉ. अमेय, डॉ. ऋुतुजा, डॉ. निलेश, डॉ. तेजस्विनी हे त्यांच्या क्षेत्रामध्ये पारंगत असून संगमनेरकरांना आता वैद्यकीय सेवेची उणीव भासणार नाही. या हॉस्पीटलमध्ये नेत्ररूग्णांसाठी स्वतंत्र विभाग आहे. डॉ. निलेश देशमुख व डॉ. तेजस्विनी देशमुख यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नविनदृष्टी दिली आहे. असेही आ. थोरात म्हणाले. उत्तम बांधकाम, उत्तम आर्किटेक्ट, सर्व प्रकारच्या मशिनरी आणि सर्व आजारांवरच्या सुविधा येथे असल्याने मला देशमुख परिवाराचा अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.
डॉ. सुधीर तांबे यांनी 1988 सालच्या आठवणींना उजाळा दिला. मी 1988 साली या हॉस्पिटलचे उद्घाटन केले होते. डॉ. अनिल देशमुख यांनी विसावा बिल्डिंगपासून केलेली सुरूवात आता भव्यदिव्य अशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरीत झाली आहे. डॉ. अमेय यांनी कोव्हिड-19 च्या काळात जीव ओतून काम केले. डॉ. अमेय छातीरोग तज्ज्ञ असल्याने त्यांनी कोव्हिड काळात अनेकांचे प्राण वाचविले. तर डॉ निलेश यांनी नुकत्याच एका चार वर्षांच्याल चिमुकल्याला झालेल्या मोतीबिंदुवर अवघड परंतु यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवदृष्टी दिली. असा गौरपूर्ण उल्लेख यावेळी डॉ. तांबे यांनी केला.
उद्योजक राजेश मालपाणी यांनी हॉस्पिटलच्या इमारतीचे कौतुक केले. येथील सोई-सुविधा अद्ययावत असून नियोजनही अचूक आहे. डोळ्यासारख्या अवयवावर किचकट किंवा मोठी शस्त्रक्रिया करायची असेल तर अनेक वेळा येथील रूग्णांना मुंबई, नाशिक, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात जावे लागते परंतु डॉ. निलेश यांनी या सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध करून देऊन येथील रूग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे असे मत राजेश मालपाणी यांनी मांडले.
मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी श्रीमती सुलोचना देशमुख, उज्वला देशमुख, डॉ. शुभदा देशमुख, डॉ. तेजस्विनी देशमुख, डॉ. ऋुतुजा देशमुख या स्त्रीशक्तीचे मनापासून कौतुक केले. देशमुख परिवार हा केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान देत असल्याचे सौ. तांबे म्हणाल्या. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे संगमनेर आता सुपर स्पेशालिटी हॉस्टिलचे हब झाले आहे. कान-नाक-घसा विभाग, नेत्र विभाग, जनरल मेडिसीन विभाग, श्वसन विकार व अॅलर्जी विभाग, अतिदक्षता विभाग, स्त्री रोग व प्रसूती विभाग, युरो सर्जरी विभाग, अस्थिरोग विभाग या विभांगाची अद्ययावत सोय संपूर्ण जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देणे ही सोपी गोष्ट नव्हती. देशमुख परिवाराने हे दीव्य पार पाडल्याचे डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या. वसंत देशमुख, सेवानिवृत्त सनदी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. कॉन्ट्रॅक्टर सुधीर थोरात, आर्किटेक्ट अभिषेक आहेर, पंकज मालुंजकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अमेय देशमुख यांनी केली.
सूत्रसंचलन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार डॉ. निलेश देशमुख यांनी मानले.
मानले.