लंडनमधील वाघनखे महाराजांचे नाही

शिवप्रेमींची दिशाभूल करू नका – सावंत

कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी देखील सरकारच्या वाघनखासंदर्भातील दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही वाघनखे शिवछत्रपतींनी वापरलेली नसून सरकारने जनतेची दिशाभूल करू नये असे म्हटले आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात इतिहासाचा उलगडा करत अनेक प्रश्न उपस्थित केले असून अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. 1919 पर्यंत होती. ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होते. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं महाराष्ट्र शासन भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखे नाहीत हे स्पष्ट असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले.
इ.स. 1818 मध्ये इंग्रजांनी दुसर्‍या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवले होते. त्या महाराजांनी जेम्स कनिंगह्याम ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो सातार्‍याचा रेसिडेंट सुद्धा होता आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती. त्यांना भेट म्हणून वाघनखे दिली होती. ती वाघनखे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली असून तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत. त्या वाघ नखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही, असे इंद्रजित सावंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख