फोपसंडीत संगमनेरचे दोन पर्यटक बुडाले

शोध मोहिमेनंतर सापडले दोघांचे मृतदेह

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले- तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले संगमनेर तालुक्यातील दोन पर्यटक बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समोर आली होती. चार तरुण पर्यटनासाठी फोफसंडी येथील पानवठा डोहावर आले असतांना ही घटना घडली. काल दिवसभर पोलीस, वनविभाग व गोताखोरांच्या मदतीने या तरूणांची शोध मोहिम सुरू होती. मात्र सततच्या पावसामुळे त्यात अडथळा येत होता. आज सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिम राबविली असता या दोन्ही तरूणांचे मृतदेह सकाळी 11 वाजता याच डोहातील एका कपारीत अढळून आले.


संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मयत अभिजित वर्पे व पंकज पाळंदे यांच्यासह त्यांचे दोन मित्र पर्यटनाासठी आले होते. फोफसंडी येथे दुचाकीवर ते फिरत होते. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हे चार पर्यटक मित्र फोफसंडी गावाजळ असणार्‍या एका ओढ्यावर पाणवठा या ठिकाणी पाण्यात उतरले असता एकाचा पाय घसरला आणि पाण्यात बुडू लागला यावेळी दुसर्‍याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतू यात दोघंही बुडाले. सोबत असलेल्या दोघा मित्रांनी ही माहिती गावकर्‍यांना दिली. त्यांनंतर काही गावकरी घटनास्थळी पोहोचले. बुडालेले दोघांचा शोध सुरू केला मात्र अद्याप त्यांचा मृतदेह सापडला नाही. पोलीस व वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाद्वारे व गोताखोरांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली. रात्री पर्यंत ही शोध मोहिम सुरू होती मात्र पावसामुळे व्यत्यय येत होता. आज सकाळी पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक प्रविण दात्रे, पो. कॉ. अशोक गाडे, विजय मुंडे यांच्यासह पथकाने या खोलपाण्यात शोध घेतला असता या दोघांचेही मृतदेह अढळून आले. पाणवठा येथे पाण्याची खोली जास्त असल्याने यात हे पर्यटक बुडाले होते. फोफसंडी हे अतिदुर्गम निसर्गरम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्य भरातून अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. सध्या अकोले तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहे मोबाईलला नेटवर्क नसल्याने ही माहिती लवकर इतरांना समजली नाही. प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असुन त्यांचे शोध कार्य सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख