आरोपीने दिली आईच्या हत्येची कबूली
युवावार्ता ( प्रतिनिधी)
तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याबाबत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटामध्ये सापडलेल्या अवस्थेमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत त्वरित तपास केला हा मृतदेह संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीचा असल्याचे तपासात समोर आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालत कसून चौकशी सुरुवात केली. त्यांचे पथक व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांनी या खून प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला. सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासण्यात आले. या अल्पवयीन मुलीचा तुषार विठ्ठल वाळुंज रा. लक्ष्मीनगर. संगमनेर याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
या आरोपीने सदर मुलीस मंगळवार दि. 19 सप्टेंबर रोजी चंदनापुरी घाटात नेले होते. आरोपीने शहरामधून दारू खरेदी केली होती. आरोपीची व या मुलीची जुनी ओळख असल्याने त्याने चंदनापुरी घाटात गेल्यानंतर सदर मुलीस दारू पाजली. दोघेही दारू पिल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार केले.
दरम्यान पिडितेची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून आरोपी वाळुंज याने भयानक कृत्य करत तिला जवळ असलेल्या पाण्यात लोटून दिले. येथे पाऊस पडत असल्याने या मुलीची बॉडी कुझून गेली. तिच्या अंगाला किड्यांनी खाल्ले होते. त्यामुळे तिच्या अंगावर मोठ्याप्रमाणात जखमा दिसून येत होत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. मात्र पोलीसांना गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीसांनी त्याला अटक केली.
आरोपीने दिली आईच्या हत्येची कबूली
या गुन्ह्यातील आरोपीने 17 जानेवारी 2023 रोजी स्वत:च्या आईची गळफास देऊन हत्या केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. त्या गुन्ह्यात पोलीसांनी अकस्मीत मृत्यू म्हणून फाईल बंद केली होती. मात्र आता या संबंधीत गुन्ह्यातही तपास करून आरोपीस लवकरच अटक केली जाईल.