बंदुकीच्या धाकावर लुटमार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

तिघांचा शोध सुरू, दोन्ही दुचाकी ताब्यात – साकूरमध्ये घडला होतात थरार

युवावार्ता (प्रतिनिधी)
साकुर – संगमनेर तालुक्यातील साकूर येथे सोमवारी भर दुपारी दिड वाजता दरोडेखोरांनी शसस्त्र दरोडा टाकत सोनाराच्या दुकानात लुटमार केली. दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत पळ काढला. त्यांना रस्त्यात अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या नागरीकांना देखील बंदूकीचा धाक दाखवत हवेत गोळीबार करीत पारनेरच्या दिशेने फरार झालेल्या या दरोडेखोरांचा संगममनेर, पारनेरसह नगरच्या गुन्हे शाखेने पाठलाग सुरू केला होता. साकूर या घटनास्थळापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर असणार्‍या वासुंदे (ता. पारनेर) येथील परिसरात काल पासून पोलीसांनी नाकाबंदी करून आरोपींची शोध मोहिम सुरू केली होती. स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी आज मंगळवारी यातील दोन जणांच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरीत तीघांचा शोध सुरू आहे.


तालुक्यातील साकूर येथील बसस्थानकाजवळील कान्हा ज्वेलर्स दूकान लूटून नले. या लुटीनंतर सदर चोरट्यांनी भर गर्दीमध्ये हवेत गर्दीमध्ये बंदूक दाखवत घटनास्थळावूनर धुमस्टाईलने पळ काढला. ही घटना साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते रऊफ शेख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, घारगाव पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना कळविली. त्यानंतर पथकाने पारनेरच्या दिशेने पळालेल्या चोरट्यांना पाठलाग सुरू केला आहे. दरम्यान या रस्त्त्यातील मांडवे फाटा, खडकवाडी याठिकाणी नागरीकांनी या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता. चोरट्यांनी हवेत गोळीबार करत धुम ठोकली. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबख उडाली.

साकूर बसस्थानकजवळील निखील सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स दूकानात दुपारी दिड वाजेच्या सुमारास पल्सर गाडीवर पाच दरोडेखोरांनी येऊन प्रवेश केला. निखिल लोळगे व तेथे असलेल्या एका ग्राहकाला बंदूकीचा धाक दाखवत बाजूला केले. त्यांनी कान्हा ज्वेलर्स दुकानातील संपूर्ण सोन्याचा माल बँगेत भरून लूटून नेला. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले होते. दरोडेखोरांनी गंठण, चैनी, मंगळसूत्र, वाट्या, कान चैनी, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन फरार झाले. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली मात्र या दरोड्याखोरांकडे बंदूक असल्याने त्यांनी बंदूकीचा धाक दाखवून नागरीकांना धमकावत तेथून पारनेरच्या दिशेने धुम ठोकली.
दरम्यान घारगाव पोलिस, गुन्हे शाखा, पारनेर पोलीसांच्या टिम दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना झाल्या. दरम्यान दरोडेखोरांकडे बंदूक असल्याने त्यांची गाडी अडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना बंदूकीचा धाक दाखवून प्रसंगी हवेत गोळीबार करत पसार झाले. पोलीसांचे वेगवेगळे पथक त्यांच्या मार्गावर असतांना पारनेर तालुक्यातील वाशुंदे शिवारात सदर दरोडेखोर लपल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी या ठिकाणी डोंगराळ परिसरात नाकेबंदी करत नागरीकांच्या मदतीने सर्चमोहिम राबवत दोघांना गजाआड केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख