लाडक्या बहिणींची अमोल खताळ यांना साद

माझे पंधराशे घे, पण विजयी हो

लाडक्या बहिणी व भावांच्या पाठींब्याने महायुतीला बळ

संगमनेर:युवावार्ता, संगमनेर विधानसभेत एकूण तेरा उमेदवार निवणुकीच्या रिंगणात उभे आहेत. महायुतीच्या शिवसेना पक्षाकडून उभे असलेल्या अमोल खताळ यांना ग्रामीण भागातील महिलांनी १५०० रुपये देऊन भाऊ तुम्हीच आमदार होणार असे आश्वासन दिल्याने खताळ काही वेळ भारावून गेले. सध्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा ग्रामीण भागात धडकू लागल्या आहेत. जो तो आम्ही कसे चांगले हे प्रचार सभेत मांडताना दिसत आहेत. महायुतीच्या सरकारने महिलांसाठी “लाडकी बहिण” हि योजना सुरु करून १५०० रुपये दर महिना देऊन महिलांचे मतांमध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न केला.

संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमोल खताळ यांची परिस्थिती पाहता एक सायबर कॅफे चालवणारा युवक आमदारकी कशी लढवू शकतो. परंतु मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने आणि दिलेल्या जबाबदारीने त्यांनी गेल्या चार ते पाच वर्षात संगमनेर तालुक्यातील सामान्य जनतेचे कामे केले. त्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्याने त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली खरी पण आर्थिक बाजू कमकुवत असल्याने जनतेने अनेक ठिकाणी त्यांच्या झोळीत पैसे देऊन उमेदवारीसाठी शुभेच्छा देत विजयासाठी आशीर्वाद देत आहेत.

खताळ यांचा ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरु असताना काही महिला समोर येऊन खताळ यांना १५०० रुपये देऊन त्यांना भाऊ आमदार होऊनच या असा आशीर्वाद दिल्याने खताळ यांच्या डोळ्यात काही वेळ पाणी तरळले. आणि ग्रामीण भागात मिळणारा प्रतिसाद पाहता भारावून गेले. त्यामुळेच यंदाची निवडणूक हि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच होणार असून येत्या २३ नोव्हेंबरला तालुक्याचा आमदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख