बाजार समितीतून सात लाखांची चोरी

दोन आरोपी गजाआड, एक फरार, 6 लाख 70 हजार हस्तगत

बाजार समितीत चोरी झाल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एकच पळापळ सुरू होती. या गडबडीत या पैशातील 11 हजार रूपये आरोपीच्या हतातून पडले. मात्र त्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. यावेळी स्वदेश उद्योग समोहातील सौरभ डुबे या तरूणाला हे पैसे सापडले. त्याने जबाबदारी व प्रामाणिकपणा दाखवत सदर पैसे पोलीसांकडे सुपूर्द केले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते सौरभचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपस्थित होते.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात विविध कारणावरून तणाव असतांना पोलीस यंत्रणा हा तणाव निवळण्यासाठी कार्यरत असतांना इकडे मात्र चोरटे हात साफ करत आहे. शहरातील मार्केट कमिटी भर दुपारी चोरट्याने लाखो रूपयांची रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नागरीकांच्या प्रसंगवधनामुळे दोघांना पकडण्यात यश आले. तर एक मात्र फरार झाला.


बुधवारी दुपारी संगमनेर मार्केट यार्ड या ठिकाणी गाडीच्या डिक्की मधून 7 लाख रुपये काढत असताना आरोपींनी बळजबरीने ते पैसे ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. जबरी चोरी करणार्‍या तीन आरोपी पैकी दोघांना पकडण्यात यश आले असून एक जण 30 हजार रुपये घेऊन पळून गेला.
अन्नुकुमार अवदेश यादव व अमनकुमार जगन यादव (राहणार नयाटोला, जोराबगंज, तालुका कोढा, जिल्हा कटिहार, बिहार) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा तिसरा साथीदार (नाव माहित नाही) पळून गेला आहे. बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर मार्केट यार्ड या ठिकाणी पांडुरंग यशवंत शेटे (राहणार मालदाड रोड, सुकेवाडी) हे काही कामानिमित्त आले होते. आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले 7 लाख रुपये रोख ते बाहेर काढत असताना त्यांच्या वर लक्ष ठेवून असलेल्या तीन आरोपींनी हातातील पैसे बळजबरीने ओढून घेऊन पळ काढला. आरोपींचा पाठलाग करण्यात आला व त्यातील दोघांना जागेवरच पकडण्यात आले. पळून गेलेल्या एका आरोपीने 30 हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेला व ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून 6 लाख 70 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख